सोशल मीडियावर मोठा बदल(social) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Meta Platforms च्या Facebook आणि Instagram सारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करण्यासाठी भविष्यात KYC प्रक्रिया अनिवार्य केली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या देशभरात रंगली आहे.केंद्र सरकारकडून फेक अकाउंट्स, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी कडक नियम आणण्याची तयारी सुरू असून, यासाठी संसदीय समितीने महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे.

या प्रस्तावानुसार, युजर्सना सोशल(social) मीडिया अकाउंट तयार करताना किंवा लॉगिन करताना ओळख पडताळणी करावी लागू शकते. या नव्या व्यवस्थेमुळे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक होऊ शकते. बँक खाते उघडताना किंवा सिम कार्ड घेताना जशी KYC प्रक्रिया केली जाते, त्याच धर्तीवर सोशल मीडियासाठीही नियम लागू होण्याची शक्यता आहे. सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे बनावट प्रोफाइल्सना आळा घालणे, ऑनलाइन गैरप्रकार कमी करणे आणि युजर्सची खरी ओळख सुनिश्चित करणे हा आहे.

तसेच, वयाची पडताळणी (social) देखील बंधनकारक केली जाऊ शकते, ज्यामुळे अल्पवयीनांच्या वापरावर नियंत्रण ठेवता येईल. मात्र, हे नियम अद्याप प्रस्तावाच्या टप्प्यात असून अंतिम निर्णय झालेला नाही. पण जर हा निर्णय लागू झाला, तर सोशल मीडिया वापरण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार हे निश्चित मानले जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *