नाशिकमध्ये समोर आलेल्या अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची (Ashok Kharat case) लाट उसळली आहे. चेहरा पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातने या विश्वासाचा गैरफायदा घेत अनेक महिलांचे शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. विशेषतः एका ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून, मागील दोन वर्षांपासून तिच्यावर मानसिक आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे.

तक्रारीनुसार, खरात महिलेला तिच्या पतीच्या (Ashok Kharat case) जीवाला धोका असल्याची भीती दाखवत होता. “तुझा नवरा मरेल” अशा धमक्या देत त्याने तिला आपल्या जाळ्यात अडकवले आणि स्वतःसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. भीती आणि अंधश्रद्धेचा आधार घेत त्याने तिचे सतत शोषण केले. अखेर धाडस करून पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाची गंभीरता (Ashok Kharat case) लक्षात घेत पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री कारवाई करत खरातला अटक केली. पोलिसांनी त्याच्या घरात अचानक प्रवेश मिळवण्यासाठी वेगळी युक्ती वापरली. घरात चोरीचा बनाव करून आत शिरल्यानंतर त्यांनी झडती घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला.तपासादरम्यान खरातचे काही राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. तो अनेक नामांकित व्यक्तींचे भविष्य सांगत असल्याने त्याचा प्रभाव मोठा होता. मात्र, या सगळ्या आड त्याने बेकायदेशीर कृत्ये सुरू ठेवली होती, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
पोलिसांनी त्याच्या फार्महाऊसवर छापा टाकला असता तेथे काही (Ashok Kharat case) महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेचे तपशील तसेच एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. न्यायालयाने खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या काळात पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे.दरम्यान, या प्रकरणात आणखी किती महिला बळी ठरल्या असतील याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकारामुळे समाजात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तींपासून सावध राहावे आणि संशयास्पद प्रकार तात्काळ कळवावेत.
हेही वाचा :
रोहित शर्मा किंवा एमएस धोनी नाही तर हा आहे आयपीएलचा बेस्ट कर्णधार, आकडेवारी वाचा
मोठी बातमी! अली लारीजानी यांच्या हत्येनंतर रशियाचा संयम सुटला, पुतीन संतापले, अमेरिका-इस्रायलवर…
संपत्ती दिली नाही तरी चालेल, पण प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना या दोन गोष्टी द्याव्याच