नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात मोठ्या चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात (fraudster) प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. अध्यात्माच्या आडून सुरु असलेल्या गैरप्रकारांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. एसआयटीच्या कारवाईनंतर खरातच्या साम्राज्याचा एकेक थर उलगडू लागला असून, अल्पावधीत उभी राहिलेली प्रचंड संपत्ती आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

श्री शिवनिका संस्थानच्या माध्यमातून (fraudster) खरातने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अत्यल्प मालमत्ता दाखवणाऱ्या या संस्थानने काही वर्षांतच कोट्यवधींचा टप्पा गाठल्याने तपास यंत्रणाही चक्रावल्या आहेत. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी तोट्यात असल्याचे दर्शवलेले हे संस्थान अचानक प्रचंड नफ्यात कसे आले, याचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, या वाढीमागे केवळ देणग्या किंवा (fraudster) धार्मिक कार्य कारणीभूत नसून, इतरही आर्थिक स्त्रोतांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. काही व्यवहार, मालमत्ता खरेदी आणि निधीच्या हालचालींचा बारकाईने मागोवा घेतला जात असून, त्यातून अनेक आर्थिक कनेक्शन उघड होण्याची चिन्हे आहेत. विशेषतः 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या देणग्यांमुळे संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, खरातच्या (fraudster) संपर्कात असलेल्या काही राजकीय व्यक्ती, अधिकारी आणि व्यावसायिकांबाबतही तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहेत. या प्रकरणात केवळ एक व्यक्ती नव्हे, तर मोठे जाळे कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, अशा प्रकारच्या भोंदूगिरीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली गेली पाहिजेत, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?
पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?
महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर