कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभा तसेच विधान परिषद या (legislative session) दोन्ही सभागृहात कोणत्याही विषयावर बोलताना विधिमंडळ सदस्याला एक प्रकारचे सुरक्षा कवच असते.
सदस्यांने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्याच्या विरुद्ध
सभागृहाबाहेर कोणत्याही प्रकारची कारवाई करता येत नाही. या विशेष (motives) अधिकाराचा काही जण गैरफायदा घेत असतात तेव्हा त्यांचे हेतू तपासून पाहिले पाहिजेत. कारण त्यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे पडसाद समाजात उमटत असतात.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड हे बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून अनावधानाने वक्तव्य केले गेले आहे असे कधीच म्हणता येणार नाही. कारण ते जाणीवपूर्वक बोलत असतात. आपल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद समाजात उमटत असतात, सामाजिक वातावरण प्रदूषित होत असते हे माहीत असूनही
ते बोलतच असतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांचा राज्याभिषेक होत (legislative session) असताना त्यांच्या कपाळावर पायाच्या अंगठ्याने टिळा लावला होता असे एक भडक वक्तव्य त्यांनी विधिमंडळात बोलताना केले आहे. त्यांना या निमित्ताने एका विशिष्ट जातीला लक्ष्य करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक इतिहास संशोधकांनी लिखाण केले आहे. पण कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर पायाच्या अंगठ्याने टिळा लावला होता असे म्हटलेले नाही. असे खरोखरच घडलेले असेल तर इतकी महत्त्वाची खळबळजनक माहिती राज्यातील इतिहास संशोधकांनी लपवून का ठेवली असेल? याचाही खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी केला असता तर बरे झाले असते. पण अगा जे घडलेच नाही ते त्यांनी आत्ताच का सांगावे? विधिमंडळाच्या सभागृहात
त्यांनी हे वक्तव्य करण्यामागचे हेतू आता खरोखरच तपासून पाहिले पाहिजेत.
शिवसेनेचे एक मंत्री शंभुराज देसाई, दादा भुसे
व अन्य काही सदस्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बेताल वक्तव्याचा केवळ निषेधच केला नाही तर सभापतींनी त्यांना निलंबित केले पाहिजे अशी मागणी केली. तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य येथून पुढे तुमच्याकडून केले गेले तर विधिमंडळ अधिनियम 53 अन्वये तुमच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा सभापतींना द्यावा लागला.
आपण एका पुस्तकाचा आधार घेऊन हे वक्तव्य केलेले आहे असा खुलासा आव्हाड यांनी केला असला तरी ते पुस्तक कोणी लिहिली आहे, आणि कोणत्या आधाराने संबंधितांने अशा प्रकारचा दावा केला आहे, त्याबद्दलचे ऐतिहासिक पुरावे काय आहेत? याचेही स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी देणे आवश्यक होते. तथापि विधिमंडळ अधिवेशनात काहीही बोलण्याचा, कोणाही जातीचा अपमान करण्याचा
विशेष अधिकार वापरणाऱ्या आव्हाड यांचे हेतू म्हणूनच तपासून पाहिले पाहिजेत.
जितेंद्र आव्हाड यांनी बेताल (motives) आणि वादग्रस्त वक्तव्य (legislative session) करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्र पुरुषाची, तमाम भारतीयांची जाज्वल्य अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांचीच निवड आत्तापर्यंत केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा अतिशय संवेदनशील विषय आहे. हे माहीत असूनही त्यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे. कधी ते शिवरायांची उंची काढताना ते साडेचार पाच फुटाचे होते असे सांगतात. अफजल खान, औरंगजेब हे होते म्हणून शिवाजी मोठे असे भडकावू विधान त्यांनी पूर्वी केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज मग काय गोट्या खेळत होते
असे संताप जनक विधानही तेच करतात.
जातीअंताची लढाई आपणच सुरू केली आहे (legislative session) अशा थाटात त्यांनी आपल्या मुली पर जातीत दिल्याशिवाय जातीय भेद संपणार नाहीत. मी माझी मुलगी एका ख्रिश्चनाला दिली आहे. हे त्यांचे वक्तव्य सुद्धा निखळ नाही, वादग्रस्तच आहे. अशा प्रकारचे विधान आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने केल्याचे ऐकिवात नाही. मी एकाच व्यक्तीला मानतो आणि ती व्यक्ती म्हणजे शरद पवार आणि माझा देव म्हणजे अल्ला असेही विधान अकारण करतात. कारण तसे त्यांना कोणीही विचारलेले नसते. पण ते जे काही बोलतात त्या पाठीमागे एक सूत्र असते. कुणाला तरी खुश करावयाचे असते तर कुणालातरी खिजवायचे असते. पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर टिळा लावला या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे. आपले वादग्रस्त वक्तव्य अंगलट येत आहे असे दिसताच जितेंद्र आव्हाड यांनी माफीनामा दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो असे ते म्हणू लागले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अशा प्रकारची वादग्रस्त विधाने इथून पुढे त्यांच्याकडून होऊ नयेत असे त्यांच्याकडून वदवून घेतले पाहिजे. आधी वादग्रस्त बोलायचे आणि नंतर माफी मागायची हे चालणार नाही असे त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण