महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. Eknath Shinde हे सोमवारी अचानक दिल्लीला रवाना झाले असून ते पंतप्रधान Narendra Modi यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी राज्यातील महायुतीत सुरू असलेल्या कुरबुरींमुळेच हा दौरा होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे-मोदी भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

अलीकडे झालेल्या महापालिका आणि (gained momentum) जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेला चांगले यश मिळाले. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी युती करून निवडणुका लढवल्या आणि विजयही मिळवला. मात्र निकालानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत काही ठिकाणी शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात बहुमत असूनही शिवसेनेला तडजोड करावी लागल्याची नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते Sunil Tatkare यांच्यात जोरदार वाद झाल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, दोन महिन्यांपासून रखडलेली Kalyan-Dombivli Municipal Corporation ची महासभा अखेर सोमवारी पार पडली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे सभागृह नेतेपद भाजपच्या वाट्याला गेले. भाजपचे नगरसेवक Varun Patil यांची सभागृह नेतेपदी निवड झाल्याची घोषणा महापौर Harshali Thavil यांनी केली. त्याचबरोबर स्थायी समितीवरही विविध पक्षांच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेत शिवसेना, भाजप आणि मनसे यांची सत्ता असून शिवसेना ठाकरे (gained momentum) गट विरोधी बाकांवर बसला आहे. संख्याबळानुसार शिव आघाडीला आठ, भाजपला सात आणि ठाकरे गटाला एक अशी एकूण १६ सदस्यांची स्थायी समिती निश्चित करण्यात आली आहे. शिव आघाडीकडून गजानन पाटील, विकास म्हात्रे, जयवंत भोईर, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, महेश गायकवाड, विजया पोटे यांच्यासह मनसेचे गणेश लांडगे यांचा समावेश आहे. तर भाजपकडून दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनीषा गायकवाड, उपेक्षा भोईर, मुकुंद पेडणेकर आणि नंदू म्हात्रे यांची निवड झाली आहे. ठाकरे गटाकडून विशाल गारवे यांची स्थायी समितीवर वर्णी लागली आहे.
स्थायी समितीत अनेक (gained momentum) दिग्गजांचा समावेश झाल्याने सभापतीपदासाठी महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र महायुतीत कोणताही वाद नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता हे पद भाजपकडे जाते की शिवसेनेकडे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महायुतीतील तणावावर काही तोडगा निघतो का, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज