राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.(loans) अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कर्जमाफी योजनेबाबत अखेर राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत येत्या 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याबाबत शेतकरी आणि बँकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अनेक शेतकरी नव्या हंगामासाठी पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत होते.

कर्ज थकबाकीमुळे अनेकांना नव्याने कर्ज मंजूर होत नव्हते. (loans) मात्र सरकारच्या या घोषणेमुळे पुढील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेणे सोपे होणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीयकृत बँकांनाही कृषी कर्जवितरणाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले. कृषी क्षेत्रासाठी ठरवलेले 80 टक्के कर्जवितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी दिले.(loans) सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?
वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला