राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.(problems)प्रांजल खेवलकरांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. पुणे सायबर पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा चोरुन व्हिडिओ काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महिलेचा चोरुन व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर खेवलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे सायबर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(problems) सहमती नसताना एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी खेवलकर यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून आम्ही राज्यात मानवी तस्करी विरोधात मोठी चळवळ उभी केली असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यात कुठे ही असं घडत असेल तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करावी असे आवाहन आम्ही केलं आहे अस चाकणतर म्हणाल्या.

खेवलकर यांच्या मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह मध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी बी एन एस कलम ७७, आय टी ऍक्ट ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील व्हिडिओ काढून गैरवापर करणे याच अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा गैर पद्धतीने असे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे म्हणजे संबंधित महिलेच्या आणि तिच्या कुटुंबाची बदनामी आहे.(problems) या पुढे असे अनेक गुन्हे दाखल होतील कारण फार मोठे हे सेक्स रॅकेट आहे आणि हे रॅकेट जर उघडकीस आलं तर हे राज्यातील सर्वात मोठं रॅकेट असेल. गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला संपर्कात आहेत. आपण अशा महिलांची गोपनीयता ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेऊ अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!