जेलमध्ये सुरु झालं प्रेम, बाहेर येताच सासऱ्याचा खून – (police) आग्र्यात ‘डेंजर बबली’चा थरारक किस्सा आग्रा पोलिस एका महिलेचा शोध घेत आहेत जी पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात सव्वापाच वर्ष तुरुंगवास भोगून आली आहे. तुरुंगातच तिची ओळख प्रेमसिंह नावाच्या व्यक्तीशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि प्रेमसिंहनेच तिची जामिनावर सुटका केली.

जेलमधून सुटल्यानंतर बबली गेल्या वर्षभरापासून महल बादशाही येथे प्रियकरासोबत राहत होती. मात्र तिचे सासरे राजवीर यांना हा संबंध मान्य नव्हता. ते वारंवार याला विरोध करत होते. पोलिसांच्या मते, हा अडथळा दूर करण्यासाठी बबली आणि तिच्या प्रियकराने योजना आखली.(police) घटनेच्या दिवशी बबलीने सासऱ्याला घरी बोलावलं आणि रात्री उशिरा त्यांना बाजरीच्या शेतात नेलं. तिथे दोघांनी मिळून त्यांचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह शेतात टाकून पळून गेले.

राजवीर यांच्या पत्नी मुन्नी देवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या मते, सुन बबली ही याआधी पती हरिओमच्या खुनात दोषी ठरून तुरुंगात होती. तिथेच ती प्रेमसिंहच्या संपर्कात आली आणि सुटकेनंतर त्याच्यासोबत राहू लागली. राजवीर यांना हे अजिबात मान्य नसल्याने अखेर त्यांचा जीव घेतला गेला. घटनेनंतर पोलिसांनी शेतातील पुरावे गोळा केले. फॉरेन्सिक पथकाने तपास केला आणि एसीपी अमरदीप यांनी घटनास्थळाची पाहणी केली. (police)बमरौली कटारा पोलीस ठाण्याचे प्रभारी हरीश शर्मा यांनी सांगितले की, बबली आणि तिचा प्रियकर अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
हेही वाचा :
Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात
‘कहीं आग लगे लग जावे….सानिया मिर्झा कुणाच्या आठवणीत झुरतेय
भल्याभल्यांना नादाला लावणारी बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही!