पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा हे ऑइल

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा कोरडी पडणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकलयुक्त(oil) स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात.

मात्र यामुळे त्वचा काहीशी निस्तेज होऊन जाते. त्यामुळे त्वचेला सूट होणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करावा. बाजारात बॉडी लोशन, मॉइश्चरायजर किंवा फेस ऑइलचा(oil) वापर करतात. फेस ऑईलचा वापर केल्यामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या कमी होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फेस ऑइल म्हणजे जोजोबा ऑइल.

जोजोबा ऑइल(oil) त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवर वाढलेले पिंपल्स किंवा इतर समस्या दूर होण्यास मदत होते. त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी महिला जोजोबा ऑइलचा वापर करतात. वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जोजोबा ऑइलचे त्वचेला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ऑईलचा वापर केल्यामुळे त्वचा अतिशय सुंदर होते.

त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो:
बऱ्याचदा चुकीच्या स्किन केअर प्रॉडक्टमुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा. यामुळे त्वचा कायम चमकदार दिसते. जोजोबा ऑइल त्वचेसाठी अतिशय हलके आहे. यामुळे त्वचेची रोम छिद्रं बंद न होता तेल आत्तापर्यंत शोषले जाते. त्यामुळे ड्राय किंवा कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यासाठी जोजोबा ऑइलचा वापर करावा.

त्वचेवरील सूज कमी होते:
जोजोबा ऑइलचा(oil) वापर केल्यामुळे त्वचेवर आलेली सूज कमी होते. या तेलात असलेले अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवर वाढलेली सूज कमी करण्यासाठी मदत करतात. या तेलाचा वापर केल्यामुळे एक्झिमा आणि सोरायसिससारख्या त्वचेसंबंधी समस्या दूर होतात. जोजोबा तेल वापरण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच मग त्याचा वापर करावा.

पिंपल्स कमी होतात:
बिघडलेली पचनक्रिया, वातावरणातील बदल किंवा इतर अनेक कारणांमुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी जोजोबा तेलाचा वापर करावा. या तेलाच्या वापरामुळे त्वचेवर आलेले सर्व पिंपल्सचे डाग निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसेल. जोजोबा तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा :

कोल्हापुरात प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा; 40 दिवसात 15 वेळा पैसे उकळले

खेळाडूची सटकली, फलंदाजाच्या अंगावर धावला, दोन-तीन फटके लगावले Video

धक्कादायक ! पत्नीने नांदण्यास नकार दिल्याने पतीने थेट चाकूच भोसकला; पोटावर, कमरेत सपासप वार