दारूपेक्षाही जास्त नुकसानदायक आहेत ‘ही’ पेये

यकृताच्या आरोग्याचा विचार करताना अनेकदा लोक केवळ अल्कोहोल टाळण्यावर लक्ष केंद्रित करतात. (alcohol)मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, काही ‘नॉन-अल्कोहोलिक’ पेयेही दारूपेक्षाही अधिक नुकसानदायक ठरू शकतात. ही पेये आपल्या रोजच्या आहारात नकळतपणे समाविष्ट झालेली असतात आणि त्यामुळे आपल्या यकृताच्या आरोग्याला हळूहळू धोका पोहोचत असतो, हे कळतही नाही. यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव असून विषारी घटक फिल्टर करणे, पचन सुधारणे, ऊर्जा साठवणे अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर असतात. मात्र, ही पेये यकृतावर अतिरिक्त भार टाकतात, ज्यामुळे चरबी साचू लागते आणि ‘फॅटी लिव्हर’सारख्या गंभीर स्थिती उद्भवतात. म्हणूनच फक्त दारू टाळून भागत नाही, तर ही काही नॉन-अल्कोहोलिक पेयेही योग्य प्रमाणात आणि सावधपणेच घेतली पाहिजेत.

ही पेये चवदार वाटत असली तरी, त्यात असलेल्या कृत्रिम साखरेचे प्रमाण खूपच जास्त असते. ही साखर यकृतामध्ये चरबीच्या स्वरूपात साठते, ज्यामुळे ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ आजार उद्भवतो. यामुळे यकृतावर ताण येतो आणि त्याचे कार्य मंदावते. रोजच्या रोज ही पेये पिणाऱ्यांमध्ये यकृत सिरॉसिससारखे गंभीर त्रासही आढळतात, जे जीवघेणे ठरू शकतात.(alcohol)एनर्जी ड्रिंक्समध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफीन, आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि अतिरिक्त साखर असते. या घटकांमुळे यकृताच्या पेशींवर ताण येतो. काही वैद्यकीय अहवालानुसार, सतत एनर्जी ड्रिंक्स घेतल्याने यकृतातील एन्झाइम्स असंतुलित होतात, जे दीर्घकाळात यकृत निकामी होण्याचा धोका वाढवतात. विशेषतः तरुण पिढीमध्ये हे पेय मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याने, आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

बाजारात मिळणारे बॉटल किंवा डब्बाबंद फळांचे रस ‘१००% नैसर्गिक’ असल्याचा दावा करत असले तरी, त्यात मोठ्या प्रमाणात साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि कृत्रिम रंग वापरलेले असतात. या साखरेचा यकृतावर थेट नकारात्मक परिणाम होतो. यामुळे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’, फॅटी लिव्हर आणि इतर यकृत विकार वाढू शकतात. याला घरगुती ताजा रस घेणे हाच उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो, कारण त्यात कोणतेही अतिरिक्त घटक नसतात.

चॉकलेट दूध, स्ट्रॉबेरी शेक, प्रोटीन शेक्स इत्यादींमध्ये साखर आणि कृत्रिम फ्लेवर्स भरपूर प्रमाणात असतात. (alcohol)काही शेक्समध्ये ‘कॉर्न सिरप’सारखी घटकंही असतात, जी यकृतासाठी अत्यंत अपायकारक मानली जातात. विशेषतः लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हर वाढवण्यामध्ये ही पेये महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण त्यातील अतिरिक्त साखर आणि फॅट्स यकृतावर अतिरिक्त भार टाकतात.

बाजारात मिळणारी रेडी टू ड्रिंक आईस टी, बॉटलबंद कॉफी किंवा लॅटे प्रकारातील पेये आरोग्यदायी वाटत असली तरी, त्यात कॅफीन आणि साखरेचे प्रमाण प्रचंड असते. ही दोन्ही गोष्टी यकृतावर दबाव टाकतात आणि त्याची कार्यक्षमता कमी करतात. ही पेये नियमित पिणाऱ्यांमध्ये यकृत ‘फंक्शन टेस्ट’मध्ये बिघाड आढळतो, ज्यामुळे भविष्यात यकृताचे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा :