अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यादरम्यान अजित पवार ज्या विमान कंपनीने प्रवास करत होते, त्या विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप करण्यात आली. आता धक्कादायक अशी माहिती कंपनीच्या विमानांबद्दल पुढे येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारातमीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 8.10 ला अजित पवार कंपनीच्या विमानात बसले आणि 8.45 ला त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. (plane crash) या विमान अपघाताचे काही सीसीटीव्ही पुढे आले असून विमान जमिनीवर नक्की कसे कोसळले हे स्पष्ट दिसत आहे. विमानतळाच्या बाजूला असलेल्या एका शेतात विमान कोसळले आणि मोठे चार ते पाच स्फोट झाले. अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळताच लोकांनी थेट बारामतीकडे धाव घेतली. अजित पवार यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. अजित पवार आपल्यात नाहीत, यावर लोकांना आजही विश्वास बसत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच पक्षाची सर्व जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी आपल्याच खांद्यावर घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे येताना दिसतोय.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर कंपनीवर गंभीर आरोप केली जात आहेत. यासोबतच कंपनीवर कारवाईही करण्यात आली. त्यांच्या विमात काह त्रूटी असल्याचे अहवालात पुढे आले. मात्र, कंपनीच्या विरोधात रोहित पवार आक्रमक भूमिका घेत असतानाच आता धक्कादायक माहिती पुढे आली. पुन्हा सरकारकडून कंपनीचे विमान वापरण्यात आले.
चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांनी नुकताच कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याची माहती पुढे आली. (plane crash)कंपनीच्या विमानाने नाशिक मुंबई असा प्रवास फडणवीस, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ कंपनीच्या विमानातून नाशिक ते मुंबई असा प्रवास केला.
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर कंपनीच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केली जात आहेत. (plane crash)यादरम्यानच आता हा प्रवास करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेत आपल्या पक्षातील नेत्यांना सूचना करत कंपनीच्या विमानाने प्रवास करणे टाळा, अशा सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत