रिकव्हरीचा प्रश्नमिळालेल्या माहितीनुसार, सापडलेला ब्लॅकबॉक्स काही प्रमाणात जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्यातील डिजिटल माहिती सुरक्षित आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. डेटा खराब झाल्याची शक्यता नाकारता येत नसली तरी तज्ज्ञांकडून त्याची पुनर्प्राप्ती रिकव्हरी करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी संबंधित उपकरण परदेशातील विशेष प्रयोगशाळेत पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

अधिक सखोल चौकशीसंदर्भात सरकार पुढील एक ते दोन दिवसांत महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकते. ब्लॅकबॉक्समधील माहिती बाहेर आल्यानंतर अपघातामागील नेमकी कारणे स्पष्ट होऊ शकतात. काही व्यक्तींनी या दुर्घटनेबाबत शंका उपस्थित केल्यामुळे या डेटाचे महत्त्व अधिक वाढले आहे. डेटा यशस्वीरीत्या पुनर्प्राप्त झाल्यास तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता आहे.