सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका येथे एका भीषण अपघाताने दोन (horrific accident) तरुणांचा बळी घेतला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिलीव गावाजवळ म्हसवड रोडवरील बागवान टेकाजवळ २६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्वप्निल सुळे आणि राजवर्धन शिरतोडे या दोघांचा मृत्यू झाला, तर आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, (horrific accident) राजवर्धन बापू शिरतोडे (वय १८) हा स्प्लेंडर मोटारसायकलवरून पिलीवहून खडकी (ता. माण, जि. सातारा) गावाकडे जात होता. त्याच वेळी विरुद्ध दिशेने सुळेवाडी येथून एचएफ डिलक्स मोटारसायकलवरून स्वप्निल (समाधान) शिंगू सुळे, साईराज सुळे आणि गणेश माने हे तिघे पिलीवकडे निघाले होते. स्वप्निलचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस असल्याने कपडे खरेदी करण्यासाठी ते जात असल्याचे समजते. दरम्यान, एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकींची जोरदार समोरासमोर धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर (horrific accident) झाला. राजवर्धनच्या हात-पायांना गंभीर फ्रॅक्चर झाले होते, तर स्वप्निलला डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्धावस्थेत होता. जखमींना तातडीने अकलूज येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, राजवर्धनचा वेळापूरजवळ उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. स्वप्निलवर अकलूजमधील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु मध्यरात्रीनंतर सुमारे दीडच्या सुमारास त्याचीही प्राणज्योत मालवली.

या अपघातात साईराज सुळे याचा पाय (horrific accident) मोडला असून गणेश माने गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर अकलूज येथील इनामदार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वप्निल, साईराज आणि गणेश हे तिघेही सुळेवाडी येथील रहिवासी असून म्हसवड येथे बारावीत शिक्षण घेत होते. बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असताना आणि ‘एमएच-सीईटी’ परीक्षेची तयारी सुरू असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला.

स्वप्निलचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. दोन तरुणांच्या अकाली मृत्यूमुळे पिलीव आणि परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *