पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन गंभीररित्या समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात नियम मोडल्याच्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी पुणे पोलिस (police)आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सविस्तर कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.याचिकाकर्त्या डॉ. कल्याणी मांडके यांच्या अर्जावर सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणाने दोन्ही यंत्रणांना नोटीस बजावली. प्रकरणातील पुढील सुनावणी 22 ऑगस्ट 2025 रोजी होणार असून, गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा मुद्दा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

NGT च्या निर्देशांनुसार शहरातील तब्बल 200 गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनीपातळी तपासण्यात आली. 7 ते 16 सप्टेंबर 2025 दरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत घेतलेल्या मोजमापांत 70 ते 85 डेसिबल ध्वनीपातळी नोंदली गेली—कायदेशीर मर्यादेपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त.विशेष म्हणजे, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीची मोजमापे या डेटामध्ये समाविष्ट नाहीत. त्यामुळे वास्तविक परिस्थिती आणखी गंभीर असू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
उल्लंघन करणाऱ्या मंडळांची नावे गोपनीय ठेवण्यात आली असून ती उत्सवानंतर जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ती सूची सार्वजनिक न झाल्याने, पुणे पोलिस(police) व MPCB च्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून शंका उपस्थित होत आहेत.

NGT ने मागवलेल्या सविस्तर कारवाई अहवालात तपास प्रक्रिया, जबाबदारांवर केलेली दंडात्मक कारवाई व पुढील प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट करण्याची अपेक्षा आहे. सुनावणीत यंत्रणांचे प्रतिवेदन निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
लुटमारीचा बनाव रचून पत्नीचा खून; भाजप नेत्याचा धक्कादायक कारनामा…
दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बीएसएफमध्ये मेगा भरती
कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडणार