अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्याच्या घरी त्याच्या पत्नीचा(wife) मृतदेह आढळला. सुरुवातीला हा प्रकार चोरीच्या हेतूने हत्या केल्याचा भासत होता. मात्र पोलिसांनी केलेल्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या आड येत असल्यामुळे भाजप नेत्याने पत्नीचा काटा काढला आहे. रोहित सैनी असं या भाजप नेत्याचं नाव असून त्याने पत्नी संजू हिची हत्या केली आहे. प्रियसी रितु लग्नासाठी तगादा लावत होती. त्यामुळे हे कृत्य घडल्याच समोर आलं आहे.

प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, किशनगढमध्ये भाजप मंडल सरचिटणीस नेते रोहित सैनी यांनी त्यांच्या प्रेयसीसोबत नियोजन करून पत्नी संजू सैनी यांची हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, रोहित आणि रितू दोघेही २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलिस चौकशीत असेही समोर आले की, हत्येच्या वेळी रितू उपस्थित नव्हती पण नियोजनात सहभागी होती.
रविवारी, १० ऑगस्ट रोजी दुपारी २:०० वाजता किशनगड येथे, तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असताना, सिलोरा भाजप मंडळाचे सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नीला दिवसाढवळ्या घेरण्यात आले आणि दरोडा टाकण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात, रोहितच्या पत्नीचा (wife)गळा आरोपींनी कापला. पोलिसांनी रुग्णालयात रोहितची मानसिकदृष्ट्या चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपक शर्मा म्हणाले की, पतीने रात्री उशिरा हत्येत सहभागी असल्याचे कबूल केले. यासह, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शर्मा यांनी माहिती दिली की पोलिसांना सुरुवातीपासूनच पतीवर संशय होता. ज्याच्या आधारे, जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याच्या जबाबात फरक दिसून आला. त्या आधारावर चौकशी केली असता, त्याने हत्येत आपला सहभाग कबूल केला.
हेही वाचा :
दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बीएसएफमध्ये मेगा भरती
कोयना धरणाचे ६ वक्र दरवाजे ३ फूट उघडणार
गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ, रक्कम वाचून डोळे होतील पांढरे!