महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल अधिक तीव्र होत असून राज्यातील तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. हवामानातील सतत बदलांनंतर आता कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असून पुढील 24 तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्यात कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उकाडा अशा बदलत्या हवामानाचा अनुभव नागरिकांना आला होता. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे.
विदर्भात उष्णतेची तीव्रता सर्वाधिक वाढल्याचे दिसून येत आहे. अमरावती येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येथे कमाल तापमान 39.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. (the weather) तसेच अकोला येथे 40.7 अंश, वर्धा येथे 40 अंश, ब्रह्मपुरी येथे 39.2 अंश, चंद्रपूर येथे 39.2 अंश, वाशिम आणि यवतमाळ येथे प्रत्येकी 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही तापमानात वाढ झाली असून ते 38.7 अंशांवर पोहोचले आहे. कोकण विभागात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 11.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.
पुणे शहरातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. शुक्रवारी पुण्यात या हंगामातील सर्वाधिक 36.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, (the weather) तर किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस इतके होते. शहरासह जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा वाढत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(the weather) दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, शरीराला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्यावी आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी