अर्जुन तेंडुलकर – सानिया चंडोक यांच्या लग्नात मराठमोळ्या अभिनेत्रीची उपस्थिती… अभिनेत्रीच्या पतीची क्रिकेट विश्वात मोठ्या ओळखी… कोण आहे ‘ती’?

भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी कुटुंबियांच्या सहमतीने 5 मार्च रोजी लग्न केलं. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात क्रिकेट विश्वातील दिग्गजांपासून, बॉलिवूडकर आणि (Marathi actress) अनेक उद्योजकांनी देखील हजेरी लावली मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये सानिया आणि अर्जुन यांचं लग्न पार पडलं. सध्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सानिया आणि अर्जुन यांच्या लग्नासाठी अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, अंबानी कुटुंब, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय देखील उपस्थित होते. सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. पण एका मराठमोळ्या अभिनेत्रीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. मराठमोळी अभिनेत्री काजल काटे – कदम देखील उपस्थित होती

सध्या सानिया आणि अर्जुन यांच्या लग्न सोहळ्यातील काजल हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, काजोल हिचा पती आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये फिटनेस कोच म्हणून काम पाहात आहे. (Marathi actress) गेल्या काही दिवसांपासून तो फिटनेस कोच म्हणून काम पाहत आहे. मुंबई इंडियन्सच्या अनेक क्रिकेटपटूसोबत त्याची खास आणि जवळची मैत्री आहे काजल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. मालिकेतील काजल हिच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अर्जुन आणि सनिया यांच्या लग्नातील अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अर्जुन याची पत्नी सानिया चंडोक कोणतं साध नाव नाही. सानिया भारतातील दिग्गज उद्योजक आणि ग्रेव्हिस ग्रुपचे अध्यक्ष रवी घई यांची नात आहे. सानियाने परदेशात व्यवसाय आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे (Marathi actress) आणि ती तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय भूमिका बजावते, ज्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आणि लाइफस्टाइल ब्रँडचा समावेश आहे. सानियाच्या कुटुंबाने भारतात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बास्किन-रॉबिन्स लाँच केला.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *