अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. त्यामध्येच आता अमेरिकेकडून मोठा हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आली. या युद्धाचा परिणाम जगातील जवळपास देशांवर बघायला मिळत आहे. महागाई वाढता आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज सातवा दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर हल्ले करत आहेत. इराण देखील मोठे हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला करत आहे. थेट ज्या हवाई तळावर अमेरिकेचे लष्कर आहे, तिथेच आता इराणने मोठा हल्ला केला. (America and Iran) या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2026 पासून युद्धाला सुरूवात झाली. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थिती अधिक बिकड झाली. इराणच्या मोठ्या शहरांना टार्गेट करू हल्ले केले जात आहेत. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणवर ताबा हवा आहे. इराणच्या सैनिकांनी शस्त्रे टाकावीत, असे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. मात्र, उलट इराणकडून थेट अमेरिकेलाच धमकी दिली जात आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असतानाच आता अमेरिकेकडून जगाची झोप उडवणारी धमकी देण्यात आली. अमेरिकेच्या सैन्याने इराणवरील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. आज मध्यरात्री इराणवर मोठा हल्ला करण्याची धमकी अमेरिकेकडून देण्यात आली. अमेरिकेचे सचिन स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, आज रात्री आमची सर्वात मोठी बॉम्ब हल्ला मोहिम इराणविरोधात असणार आहे.

इराणी क्षेपणास्त्र, लॉन्चर आणि क्षेपणास्त्र बनवणाऱ्या कारखान्यावर आम्ही मोठा हल्ला करू आणि मोठे नुकसान पोहोचू. इराणचे हल्ले कमकुवत करण्याकरिता अमेरिकेचा हा मोठा प्लॅन आहे. अमेरिकेने दावा केला की, (America and Iran) मागील काही दिवसांपासून आम्ही हल्ले करून इराणला कमकुवच करत आहोत. आज रात्रीच्या हल्ल्यांनी अजून मोठे नुकसान इराणचे होईल.

आता अमेरिकेने थेट धमकी हल्ल्याची दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने तेहरानवर मोठे हल्ले करून शहराचे मोठे नुकसान केले. आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक हल्ले अमेरिकेने इराणवर केले आहेत. (America and Iran) त्यामध्येच हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा अमेरिकेने दिला. रशिया आणि चीन देखील इराणसाठी कोणतीही मदत करताना दिसत नाहीत. उत्तर कोरिया इराणचा चांगला मित्र असूनही बघ्याची भूमिका घेत आहे.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *