पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात नवे (ongoing war) समीकरण तयार होताना दिसत आहे. इराणकडून वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने आता संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेत चीनसोबत अब्जावधी डॉलरचा करार केला आहे. अमेरिकेने सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले असतानाही इराणकडून सौदी अरेबियाला लक्ष्य केले जात असल्याने रियाधमध्ये नाराजी वाढली आहे. या परिस्थितीत सौदी अरेबियाने संरक्षणासाठी चीनकडे वळण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

चीनची सरकारी संरक्षण कंपनी Aviation Industry Corporation of China (AVIC) आणि सौदी अरेबियाची General Authority for Military Industries (GAMI) यांच्यात तब्बल 5 अब्ज डॉलरचा करार झाला आहे. या करारानुसार सौदी अरेबियातील Jeddah येथे आधुनिक ड्रोन तयार करण्यासाठी उत्पादन सुविधा उभारली जाणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य भाग म्हणजे चीनच्या अत्याधुनिक Wing Loong-3 या मानवरहित लढाऊ ड्रोनची निर्मिती आणि खरेदी.
या प्रकल्पाअंतर्गत दरवर्षी (ongoing war) सुमारे 48 ड्रोन तयार केले जाणार आहेत. त्यामुळे सौदी अरेबियाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. विंग लूंग-3 हा चीनचा अत्याधुनिक कॉम्बॅट यूएव्ही मानला जातो. हा ड्रोन केवळ टेहळणीसाठीच नव्हे तर थेट हल्ले करण्यासाठीही सक्षम आहे. अवघ्या 0.3 सेकंदांत लक्ष्य ओळखण्याची क्षमता, प्रगत अँटी-जॅमिंग तंत्रज्ञान आणि जवळपास 40 तास सलग उड्डाण करण्याची क्षमता ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. याशिवाय 10,000 किलोमीटरपेक्षा अधिक ऑपरेशनल रेंज असल्यामुळे हा ड्रोन दीर्घ अंतरावरील मिशनसाठीही वापरता येतो.
मध्य पूर्वेतील अत्यंत कठीण हवामान लक्षात घेऊन या ड्रोनची रचना करण्यात (ongoing war) आली आहे. या प्रदेशात वारंवार धुळीची वादळे येतात आणि तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. त्यामुळे या ड्रोनच्या इंजिनमध्ये मल्टी-स्टेज डस्ट प्रोटेक्शन आणि अत्याधुनिक कूलिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. त्यामुळे वाळूच्या वादळातही हा ड्रोन सुरळीतपणे काम करू शकतो.
Riyadh येथे झालेल्या डिफेन्स एक्स्पोमध्ये या ड्रोनचे यशस्वी प्रदर्शन करण्यात आले होते. पर्वतीय आणि कठीण भौगोलिक परिस्थितीतही त्याने प्रभावी उड्डाण क्षमता दाखवून दिली. या प्रदर्शनानंतर चीनच्या संरक्षण तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेबाबत असलेले अनेक प्रश्न कमी झाल्याचे मानले जात आहे.
या कराराचा आणखी एक (ongoing war) महत्त्वाचा भाग म्हणजे चीनकडून रियाधमध्ये मोठे लॉजिस्टिक्स हब उभारले जाणार आहे. येथे सुमारे दोन हजारांहून अधिक सुटे भाग साठवून ठेवले जाणार असून ते 48 तासांच्या आत आखाती देशांमध्ये पोहोचवता येणार आहेत. याशिवाय सौदीच्या वैमानिकांना डिजिटल ट्विन व्हर्च्युअल सिस्टीमच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे, जे अमेरिकन बनावटीच्या F-15 Eagle लढाऊ विमानांच्या ऑपरेटिंग सिस्टीमशी सुसंगत आहे. त्यामुळे वैमानिकांना कमी कालावधीत युद्धासाठी तयार होणे सोपे होणार आहे.
चीनचे हे पाऊल पश्चिम देशांसाठी, विशेषतः अमेरिकेसाठी, मोठे आव्हान मानले जात (ongoing war) आहे. आतापर्यंत मध्य पूर्वेतील संरक्षण बाजारावर अमेरिकेचा मोठा प्रभाव होता. मात्र आता चीन केवळ शस्त्रास्त्रे विकणारा देश न राहता पूर्ण संरक्षण इकोसिस्टीम तयार करणारा भागीदार म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील सामरिक आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी