अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या (fierce war) युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान इराणने केवळ अमेरिका आणि इस्त्रालयवरच हल्ला केला नव्हता तर इराणकडून अनेक आखाती देशांवर देखील हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये आखाती देशांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर इराणकडून आखाती देशांची माफी मागण्यात आली आहे, तसेच त्यांनी जर आमच्यावर हल्ला केला नाही तर आता शेजारील देशांवर आम्ही हल्ला करणार नसल्याचं देखील इराणने म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे या युद्धाच्या (fierce war) पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. या सामुद्रधुनीमधून केवळ चीनच्या जहाजांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी इराणने काही प्रमाणात हटवली, त्यानंतर इराणकडून अशी घोषणा करण्यात आली की, अमेरिका, युरोपियन देश तसेच त्यांचे सहकारी वगळता सर्व देशांना या मार्गाने जाऊ दिलं जाईल. दरम्यान त्यानंतर आता अखेर इराणने माघार घेतली आहे . इराणने आता हा मार्ग सर्वच देशांसाठी खुला केला आहे. त्यामुळे जगावरील एक मोठं इंधन संकट टळण्याची शक्यता आहे.

जगाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आवश्यकता आहे, त्यातील सु्मारे 25 टक्के (fierce war) तेलाची वाहतूक याच मार्गेने होते. त्यामुळे इराने हा मार्ग बंद केल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं होतं. भारताला देखील काही प्रमाणात याची झळ बसली, मात्र आता गुडन्यूज समोर आली असून, इराने हा मार्ग सर्व देशांसाठी सुरू केला आहे. हा मार्ग आता सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा इंधन पुरवठा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!

हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात

वीज बिल कमी आणि वीज वाचण्यासाठी खास ट्रिक्स.. झोपण्यापूर्वी करा ‘या’ 4 गोष्टी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *