गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता सराफा बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. विशेषतः मिडल ईस्टमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत आणि त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे.

मिडल ईस्टमध्ये अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.(gold and silver) त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होत असून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहेत. अनेक गुंतवणूकदार सध्या सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत असल्याने त्याची मागणी वाढली आहे.

दरम्यान, जळगाव सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले. आज १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७२१ रुपयांची वाढ झाली आहे. (gold and silver) त्यामुळे जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे १ लाख ६४ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सोन्याच्या या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

चांदीच्या किमतींमध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. आज चांदीच्या दरात तब्बल १० हजार ३०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. (gold and silver) त्यामुळे जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर सुमारे २ लाख ८४ हजार ५८९ रुपयांपर्यंत गेला आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे सराफा बाजारातही चर्चेला उधाण आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित पर्यायांकडे वाढलेली ओढ यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सतत चढउतार होत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात हीच परिस्थिती कायम असून पुढील काही दिवसांतही दरांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *