हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना आखाती देशातील युद्धाच्या झळा बसत आहेत. केंद्र सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी आदेश दिले आहे. त्याचा व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम दिसून येत आहे. त्यातच अजून एक मोठी कारवाई झाली आहे. काय आहे अपडेट?

देशातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर आले आहेत. आयकर चोरीचा मोठा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंटवर संपूर्ण देशात सर्व्हे करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटींची अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले आहे. हैदराबाद येथील एका बिर्याणी साखळी पुरवठा व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हे चेन व्यवसाय 46 शहरांपर्यंत पोहचला आहे. सरकारनेअभियानातंर्गत करदात्यांना (Hotel) त्यांच्या चुका सुधारण्याचा सल्ला दिला आहे. देशातील अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक आयकर खात्याच्या रडारवर आले आहेत. आयकर चोरीचा मोठा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंटवर संपूर्ण देशात सर्व्हे करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटींची अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले आहे. हैदराबाद येथील एका बिर्याणी साखळी पुरवठा व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली. हे चेन व्यवसाय 46 शहरांपर्यंत पोहचला आहे. सरकारनेअभियानातंर्गत करदात्यांना त्यांच्या चुका सुधारण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना अपडेटेड रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 63 हजार रेस्टोरेंटला ईमेल पाठवण्यात आला आहे. त्यांना 31 मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.त्यांना अपडेटेड रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 63 हजार रेस्टोरेंटला ईमेल पाठवण्यात आला आहे. त्यांना 31 मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) याविषयची माहिती दिली. त्यानुसार, आयकर खात्याने कर चोरीच्या आरोप असलेल्या रेस्टॉरंटचा सर्व्हे केला. त्यात त्यांनी 408 कोटींची विक्री लपवल्याचे समोर आले. आता सीबीडीटी अशा 63,000 आऊटलेट्सला ईमेल आणि मॅसेज पाठवत आहे. (Hotel) त्यात त्यांना या 31 मार्चपर्यंत आयकर रिटर्न अद्यायावत करण्यास सांगण्यात आले आहे.

CBDT नुसार, 22 राज्यातील 46 शहरांमधील 62 रेस्टॉरंचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला. सुरुवाती तपासात जवळपास 408 कोटी अन्नपदार्थांची विक्री लपवल्याचे उघड झाले. आयकर अधिकार्‍यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये फूड आणि बिव्हरेज क्षेत्रात तपास सुरू केला होता. या दरम्यान हे समोर आले की, रेस्टॉरंट मालक विक्रीचा आकडा गायब करत आहेत.

आयकर विभागाने नोव्हेंबर 2025 मध्ये हैदराबादमधील पिस्ता हाऊस, शाह गौस आणि महफिल यासारख्या लोकप्रिय बिर्याणी रेस्टॉरंट चेनवर छापेमारी केली होती. ही कारवाई आऊटलेट्स, कॉर्पोरेट्स कार्यालय, सॉफ्टवेअर पुरवठादार कंपन्या आणि मालकांच्या ठिकाण्यावर एकदाच करण्यात आली. या प्रतिष्ठानांकडून 20 कोटी रुपयांची रोख, मोठ्या प्रमाणात सोने आणि अचल संपत्ती जप्त करण्यात आली.

तपासाचा परीघ तेव्हा वाढवण्यात आला, जेव्हा अधिकाऱ्यांच्या तपासात मोठे घबाड सापडले. या रेस्टॉरंटला ज्या कंपन्यांनी बिलिंग सॉफ्टवेअर पुरवले होते. (Hotel) त्यात आकडेवारी लपवण्याची व्यवस्था केल्याचे समोर आले. आर्थिक वर्ष 2019-20 पासूनच आकडेवारी लपवण्याचा खेळ सुरू करण्यात आला होता. सॉफ्टवेअरच्या लॉग्समध्येच जवळपास 13,317 कोटी रुपयांच्या एंट्री डिलिट झाल्याचा रेकॉर्ड मिळाल्याने केंद्र सरकारने हादरले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात तर सुरुवातीलाच 5,141 कोटींची विक्री लपवल्याचे उघड झाले. तर बिर्याणी चेन रेस्टॉरंटने बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये गडबड करून 70,000 कोटींची विक्री लपवल्याचे समोर आले.

8 मार्च रोजी आयकर विभागाने शिमला, मुरथल, चंदीगड, लुधियाना, गोध्रा, अहमदाबाद, कोल्लम, कोच्ची, मदुराई, गुवाहाटी, दिल्ली, गुरूग्राम, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता सह 46 शहर, 22 राज्यातील 62 रेस्टॉरंटविरोधात कारवाईचा बडगा उगारला. IT कायद्याच्या नियम 133A अंतर्गत ही प्रक्रिया करण्यात आली.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *