पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; २ राष्ट्रीय महामार्ग, ७ राज्यमार्ग वाहतूकीसाठी बंद

शहरासह जिल्ह्यात पाऊस गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीसह(river) वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा ,घटप्रभा ,कासारी आदी नद्यांचे पाणी पात्र बाहेर पडले आहेत. तर पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून पंचगंगा सध्या ३७ फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण ७९ बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा आपली इशारा पातळी गाठण्यासाठी अवघी दोन फूट शिल्लक आहे.

तर काल दिवसभर शहरात पाऊसाची(river) संतधार सुरू राहिल्याने पाणीपातळीत संत गतीने वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सज्ज असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी सांगितल आहे. दरम्यान काल शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी येथे दत्त मंदिरात पाणी आल्याने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच दक्षिणद्वार सोहळा पार पडला.
गेल्या 2 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आज सकाळी आठ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगेचे पाणी पातळी ३७ फूट इतकी आहे. पंचगंगाची इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. यामुळे पंचगंगा इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक असून आपली वाटचाल इशारा पातळीच्या दिशेने सुरु केली आहे. दरम्यान पावसाचा जोर रविवारी असाच कायम राहिला तर पंचगंगा आज संध्याकाळपर्यंत धोक्याची इशारा पातळी गाठेल असा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे.
यामुळे यंत्रणादेखील सतर्क झाले असून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी स्वयंसेवक आणि एनडीआरएफ ची पथके सज्ज ठेवा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्ती आणि जनावरांचे वेळेस स्थलांतर करण्यासाठी चोख नियोजन करा स्थलांतरित कुटुंबियांसाठी निवारा व्यवस्था तयार ठेवा कोणत्याही परिस्थितीत जीवित हानी होणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना दिले आहेत.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिल्याने पाऊसाची संतताधार सुरूच राहणार आहे. जिल्ह्याल येलो अलर्ट देण्यात आला असला तरी ग्रामीण भागात असलेल्या शाहूवाडी, गगनबावडा, आजरा , राधानगरी यासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. यामुळे राधानगरी धरण ७६.७२ % भरल असून यामुळे धरणाच्या पॉवर हाऊस मधून १४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. तसेच घटप्रभा ८४३४ वारणा १५९२, कोदे ९३६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असून आता पर्यंत जिल्ह्यातील ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर २ राष्ट्रीय महामार्ग, ७ राज्यमार्ग आणि १२ जिल्हा मार्गांवर पाणी आले असल्याने हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर काही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे. दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरण देखील ८० टक्के भरले असल्याने अलमट्टी धरणातून सध्या ६५ हजार क्युसेक्स पाणी पुढे सोडण्यात येत असून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार मध्ये सातत्याने समन्वय सुरू आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडल्याने कोल्हापूर सांगली शिरोळ इचलकरंजी हातकणंगले या भागातील लोकांना काही दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
विधानसभेसाठी भाजपाचा नवा प्लॅन! ..मैदानात उतरा अन् ठोकून काढा
आम्ही चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागेल; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार
बॉयफ्रेंडसोबत बोलता बोलता ट्रेनखाली आली महिला, अंगावरून ट्रेन गेली अन् …Video