अहमदाबादच्या येथे 8 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ने वर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत चे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आणि एकूण तीन वेळा हा किताब जिंकणारा पहिला संघ ठरला.

या विजयामागे भारताचा कर्णधार याचे नेतृत्व विशेष ठरले. कर्णधार (India won) म्हणून पहिल्याच मोठ्या स्पर्धेत त्याने संघाला विश्वविजेता बनवून एक नवा इतिहास रचला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला एकतर्फी पराभूत करत ट्रॉफीवर मोहोर उमटवली.

सूर्यकुमार यादवसाठी हा विजय आणखी खास ठरला कारण त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी टक्केवारी असणाऱ्या कर्णधाराचा मान मिळवला. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 52 सामने खेळले असून त्यापैकी 42 सामन्यांत विजय मिळवला आहे. केवळ 8 सामन्यांत संघाला पराभव पत्करावा लागला, तर 2 सामने निकालाशिवाय राहिले. (India won) त्यामुळे त्याची विजयी टक्केवारी 80.77 इतकी झाली आहे.

या कामगिरीसह सूर्यकुमार यादवने भारताचा माजी कर्णधार याचा विक्रम मागे टाकला. रोहित शर्माची कर्णधार म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील विजयी टक्केवारी 80.65 इतकी होती. सूर्याने हा आकडा पार करत जगातील सर्वात यशस्वी टी20 कर्णधार होण्याचा मान पटकावला.

भारताच्या या विजयानंतर देशभरात क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (India won) त्याच्या आक्रमक शैली आणि शांत नेतृत्वामुळे टीम इंडियाला नवी ओळख मिळाल्याची चर्चा क्रिकेटविश्वात सुरू झाली आहे.

हेही वाचा :

ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या

अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा

पश्चिम बंगालच्या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींच्या अपमानावरून PM मोदींची TMC सरकारवर टीका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *