रोहित शर्मा आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि त्याची पत्नी एकमेकांना भांडत असल्याचे दिसत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारसताने न्यूझीलंडवर मात करून जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सध्या तुम्ही सोशल मीडियावर गेले तर सगळीकडे भारतीय क्रिकेट संघाच्या या दमदार कामगिरीचीच वाहवा होताना दिसत आहे. भारताने जेतेपद पटकावल्यानंतर मैदानावर खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानावर काय काय घडलं? हे सांगणारे हे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर जगभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. (Rohit Sharma) परंतु सध्या मात्र भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान मैदानावरील हा व्हिडीओ असून यात रोहित शर्मा आणि त्याची पत्नी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून या पती-पत्नीमध्ये भांडण तर झाले नाही ना? असे विचारले जातेय.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. परंतु हाच व्हिडीओ पाहून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातायत. व्हिडीओमध्ये रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह एकमेकांच्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे. मैदानाच्या सीमेजवळ हे दोघेही एकमेकांशी बोलत आहेत. विशेष म्हणजे रोहित खूप नाराज दिसतोय. (Rohit Sharma) तर रितिकादेखील रोहितशी रागात काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. रोहित तिच्या मताशी असहमत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून दोघांमध्ये भांडण झाल्याचा दावा केला जातोय. व्हिडीओच्या शेवटी रोहितची पत्नी स्मीतहास्य करतानाही दिसत आहे.
दरम्यान, या दोघांमध्ये खरंच भांडण झाले का? हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. (Rohit Sharma) परंतु सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून रोहितचे चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळच्या हंगामात रोहितकडून चांगल्या खेळाची अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा :
ही’ FD ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम, 8.10 टक्के दराने परतावा, जाणून घ्या
अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा