नागपूरच्या नारा परिसरात शेतातील खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या (death of a woman) महिलेच्या मृत्यूचे गूढ पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उकलले आहे. चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानेच तिची मारहाण करून हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून आरोपीला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

राजेंद्र ऊर्फ रज्जू यादव (वय ४०) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. (death of a woman) नारा परिसरातील साई ले-आऊटजवळील एका शेतात बांधलेल्या खोलीत काही दिवसांपूर्वी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासाला सुरुवात केली.
शवविच्छेदन (death of a woman) अहवालातून महिलेचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. मारहाणीत गर्भाशयाची पिशवी फाटल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख दासिया उईके (वय ३५, रा. छपारा, मध्यप्रदेश) अशी पटली. ती नागपूरमध्ये मजुरीचे काम करत होती.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार दासिया आणि (death of a woman) आरोपी रज्जू यादव यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही मध्यप्रदेशातील एकाच गावचे असून नागपूरमध्ये मजुरी करत होते. होळीच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात रज्जूने दासियाच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर (death of a woman) आरोपीने मृतदेह शेतातील खोलीत टाकून तेथून पळ काढला. तो मध्यप्रदेशातील छपारा येथे लपून बसला होता. जरीपटका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला छपारा येथून ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास जरीपटका पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या