महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या (paper leakage) परीक्षेत पेपरफुटीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. गणित विषयाच्या भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच टेलिग्रामवर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गणित भाग-२ ची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या तब्बल तीन दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (paper leakage) संबंधित टेलिग्राम ग्रुपमध्ये गणित विषयाच्या दोन्ही प्रश्नपत्रिका पोस्ट करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला हा प्रकार अफवा असल्याचे मानले जात होते. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे विभागीय मंडळाने व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिका आणि अधिकृत प्रश्नपत्रिकांची तुलना केली. या पडताळणीत दोन्ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पेपरफुटीची घटना खरी असल्याचे निष्पन्न झाले असून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षिततेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेनंतर पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (paper leakage) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ग्रुपचे अॅडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पेपर नेमका कुठून आणि कोणत्या माध्यमातून लीक झाला याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपासही वेगाने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, यापूर्वी बारावीच्या (paper leakage) परीक्षेदरम्यान नागपूर विभागातही अशाच प्रकारे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांचे पेपर व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर व्हायरल झाल्याची प्रकरणे समोर आली होती. त्या वेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही आरोपींना अटक केली होती. आता दहावीच्या गणिताच्या पेपरफुटीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून या प्रकरणात नेमके कोण जबाबदार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार

गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *