राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठे बदल (weather) होताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात कधी पाऊस, कधी उन्ह तर कधी थंडी अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली होती. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या वाढत्या उष्णतेदरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (weather) अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. उष्णता वाढलेली असतानाच अचानक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने हवामानात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यात मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता असून या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आगामी शनिवारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह (weather) पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारी नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून त्या वेळी जोरदार वारेही वाहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पुणे, नांदेड, बीड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात उष्णता आणि दमट वातावरणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास होऊ शकतो.
देशातील तापमानाच्या (weather) नोंदींकडे पाहिले असता राजस्थानमधील फतेहपूर येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून ते 1.4 अंश सेल्सिअस इतके होते. तर गुजरातमधील राजकोट येथे देशातील सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील तापमानातही मोठी चढउतार दिसून येत आहे. मंगळवारी अमरावती, वाशिम, ब्रह्मपुरी, सोलापूर, जळगाव आणि यवतमाळ येथे सुमारे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर राज्यातील नीचांकी तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 12.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी उष्णतेचा (weather) येलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी वापरा 5 गोष्टी, त्वचा काचेसारखी होईल चमकदार
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
तुम्हाला क्रेडिट कार्ड, बँकेकडून कर्ज मिळत नाही का? ‘या’ टिप्स जाणून घ्या