रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपाने मोठी तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(political) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांच्याच मतदारसंघात त्यांच्यासोबत निवडणूक लढवलेले आघाडीचे प्रशांत यादव यांचा आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.

इतकंच नाही तर चिपळूण मतदारसंघाचा पुढचा आमदार हा भाजपचाच असेल, असेही मोठे वक्तव्य भाजपचे युवा नेते मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. भाजपने चिपळूण मतदारसंघात धमाका करण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आज दुपारी हा प्रवेश होत आहे. यावेळी मंत्री नितेश राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा अवघ्या 6800 मतांनी पराभव झाला होता. गेले काही दिवस ते नाराज असल्याचे चर्चा होती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही भेट देऊन त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती.
मात्र प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशाची घोषणा नितेश राणे यांच्या दौऱ्यात करण्यात आली. याच दौऱ्यात राणे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर लढण्याचा असून तसेच स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
चिपळूण मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा होता. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असलेले शेखर निकम यांच्या ताब्यात गेल्यापासून हा मतदारसंघ गेले दोन टर्म राष्ट्रवादीकडे राहिला आहे. मात्र आता याच मतदारसंघात भाजपने तयारी सुरू केली आहे. 2029 साली होणार्या विधानसभा(political) निवडणुकीचे प्रशांत यादव यांना पुढील मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शब्द दिला जाण्याची शक्यता आहे. त्याआधी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक प्रशांत यादव यांनाही आपला करिष्मा दाखवावा लागेल हेही निश्चित आहे.
वाशिष्ठी उद्योग समूहाचे चेअरमन प्रशांत यादव हे उद्योजक आहेत. ते गेली काही वर्षे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रशांत यादव वयाच्या २५ व्या वर्षी चिपळूण खेर्डी गावच्या ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले होते. उपसरपंच आणि सरपंचपद भूषविताना तसेच जवळपास 15 वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत.
काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून 2018 ते 2024 या कालावधीत काँग्रेसला बळ दिलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.
हेही वाचा :
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
‘WAR 2’चा जलवा! फक्त 5 दिवसांत 300 कोटींचा टप्पा गाठला
सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू