अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (mountain)अर्थसंकल्पाच्या एका महिन्याआधीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, यावर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर मोठं भाष्य केलं. अर्थसंकल्पावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अजितदादांनी अर्थसंकल्पासंदर्भात भरपूर तयारी केली होतीय मी उद्यापासून लक्ष घालून ज्या काही प्रक्रिया आहेत. त्या पूर्ण करणार आहे. त्यानंतर आम्ही एकत्रपणे ठरवू.

सूनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवर भाष्य (mountain)करताना फडणवीस म्हणाले, ‘कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार आणि भाजप पक्ष म्हणून उभे राहू. अजितदादांचं कुटुंब असो किंवा राष्ट्रवादीचे पक्ष असेल. त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन असेल’. राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी चर्चा करून गेलेले आहेत. त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय आहे, ते त्यांनी संदर्भात चर्चा केली. अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्रफडणवीसांनी यावेळी नागपूर आणि(mountain) चंद्रपूरच्या महापौरपदावरही भाष्य केलं. ‘नितीन गडकरी आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत. महापौरच्या निवडणुकासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने रूपरेषा ठरवण्यात आली आहे. जे काही नाव आहे, त्या नावाच्या अनुषंगाने निर्णय उद्या किंवा परवा घेतले जातील. ठरल्याप्रमाणे रूपरेषेनुसारच नाव अंतिम होतील. शहराध्यक्ष, आमदार हे निर्णय घेतील, असे भाष्य फडणवीसांनी नागपूरच्या महापौरपदाविषयी केलं.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका