अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Deputy)राज्याचे न भरुन निघणारे नुकसान आहे. दरम्यान अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री होण्याची विनंती करण्यात आली. सध्या यासंदर्भात मोठी अपडेट समोर आलीय.राज्यसभेत पार्थ पवार जाणार. सुनेत्रा बारामतीतून आमदार होणार. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, या मूळ निर्णय पवार कुटुंबाचाच आहे. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सविस्तर चर्चा झाली. पुढच्या काही तासांत हालचालींना वेग येणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार देण्यात आला आहे.

अजित पवार यांच्याकडे असलेली महत्वाच्या खात्यांबाबत (Deputy)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले खाती राष्ट्रवादीलाच मिळावी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून पत्रव्यवहार केला जाणार आहे. इतर पक्षातील मंत्र्यांकडे ही खाती जाऊ नये याची काळजी पक्षपातळीवर घेतली जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे असलेल्या सर्वात महत्वांच्या खात्यांमध्ये अर्थ खाते हे सगळ्यात महत्त्वाचे खाते होतं. तसेच उत्पादन शुल्क आणि नियोजन खात्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव दिला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
अजितदादांनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राष्ट्रवादीची सूत्र कोणाच्या हातात जाणार (Deputy)असे असंख्य प्रश्न आता उपस्थित केले जातायत, मात्र दादांनंतर सुनेत्रा पवारांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्र जाण्याची शक्यता आहे. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करावी, तसंच त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी सुरेश घुले यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे ही मागणी केली आहे.
हेही वाचा :
तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!
स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…
कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?