बालिंगा (ता. करवीर) येथे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपात केंद्र (exposed)चालविणाऱ्या बनावट डॉक्टरला अखेर दोन महिन्यांनंतर करवीर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील केरबा पाटील वय ३६, रा. बालिंगा असे अटक करण्यात आलेल्या मुख्य संशयिताचे नाव असून २४ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. शहरातील बागल चौकातील एका इमारतीत तो राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार स्वप्नील पाटील याने बालिंगा येथे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना दवाखाना थाटला होता. या ठिकाणी तो बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान आणि गर्भपात करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात दिगंबर मारुती किल्लेदार याला अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य सूत्रधार असलेला स्वप्नील पाटील त्या वेळी पसार झाला होता. छाप्यात घटनास्थळावरून सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या व साहित्य जप्त करण्यात आले होते.

यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी स्वप्नील पाटीलचा भाऊ (exposed)सौरभ पाटील, गर्भपाताचे किट व औषधे पुरविणारा राहुल हिंदूराव कुसाळे तसेच विक्रम वसंत चव्हाण यांना अटक केली. या सर्वांच्या चौकशीतून स्वप्नील पाटीलच या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. गर्भपातासाठी लागणारे किट संशयित राहुल कुसाळे पुरवत असल्याचे समोर आले असून त्याच्याविरोधात यापूर्वीही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याचा ताबा आता जुना राजवाडा पोलिसांकडे देण्यात येणार आहे.मुख्य संशयिताच्या शोधासाठी करवीर पोलिसांनी मुंबई, कोकण आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी छापेमारी केली होती.

मात्र, स्वप्नील पाटील सतत ठिकाणे बदलत पोलिसांना हुलकावणी देत होता. (exposed)अखेर शहरातच तो लपून राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिस तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार स्वप्नील पाटीलविरोधात यापूर्वीही राधानगरी, जुना राजवाडा आणि कागल पोलिस ठाण्यात गर्भलिंगनिदान व गर्भपातप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आता करवीर पोलिसांनीही त्याच्यावर कारवाई केल्याने त्याच्याविरोधातील गुन्ह्यांची संख्या चार झाली आहे. या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार तोच असून सोनोग्राफी मशीन कोठून आणि कशा पद्धतीने खरेदी करण्यात आली, याबाबतची माहिती पोलिस त्याच्याकडून घेत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *