राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं सुरू आहेत.मुंबई आणि बारामतीमध्ये (resign) मोठ्या घडामोडी घडत आहेत. पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे. तर दुसरीकडे मुंबईत सुनेत्रा पवार या देवगिरी बंगल्यावर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांशी चर्चा करत आहेत. लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच गटनेतेपदी त्यांची निवड होऊन लागलीच संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. त्यादृष्टीने वेगवान घडामोडी घडत आहे.

थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. (resign) राजीनामा हा राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे पाठवणार आहेत. राज्यसभेच्या खासदारकीच्या राजीनाम्या नंतर सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेता म्हणून निवड आज दुपारी करण्यात येणार आहे. आजच संध्याकाळी ५:३० वाजता उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार शपथ घेतील. अवघ्या १० मिनिटांचा शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यावर राज्यसभेतील त्यांच्या रिक्त (resign) जागेवर पार्थ पवार यांना पाठवण्याची तयारी झाल्याचे समजते. पार्थ पवार यांचे नाव राज्यसभेवर खासदार पदासाठी पाठवण्यात येणार आहे. तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वही त्यांच्या नावासाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे. इतकेच नाही तर राज्यसभेवर जाण्याची पार्थ पवार यांची सुद्धा इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या राज्यसभेवर खासदार म्हणून पार्थ पवार यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. (resign) त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याची माहिती नसल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पार्थ पवार हे गेल्या तासाभरापासून शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. ते या घटनाक्रमाविषयी शरद पवार यांना माहिती देणार असल्याचे समजते. लवकरच राजकीय गोटातून अजून एक मोठी बातमी समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी

मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते

सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *