नाशिकरोड परिसरात बुधवारी झालेल्या भयानक अपघातात गर्भवती (pregnant)मुलीसह आईचा जागीच मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे या अपघातात पोटातील बाळाचाही जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.संध्याकाळी मुक्तिधाम चौकात ही दुर्घटना घडली. बिटको चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच ०४/ईएल ०४४६) प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक कारला घेऊन पुढे गेला आणि समोरून येणाऱ्या रिक्षालाही धडकला. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाले.

मात्र, ट्रक अद्यापही थांबला नाही. पुढे जात असताना रस्ता ओलांडत असलेल्या सुनीता भीमराव वाघमारे (वय ५०, रा. चेहेडी शीव) आणि त्यांची आठ महिन्यांची गर्भवती (pregnant)मुलगी शीतल रामचंद्र केदार (वय २७, रा. नाशिकरोड) यांना ट्रकने चिरडले. जागीच सुनीता वाघमारे यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी शीतल आणि तिच्या पोटातील बाळाचा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू पावले.

अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच मायलेकी दुर्गादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. सोनोग्राफीची तपासणी झाल्यानंतर शीतलच्या आरोग्यासाठी आणि बाळासाठी सुनीता यांनी देवीकडे मनोभावे प्रार्थना केली होती. पण त्या प्रार्थनेनंतर काही तासांतच त्यांच्या वाट्याला हा भीषण अंत आला. त्यामुळे ‘दुर्गादेवीचे दर्शनच अखेरचे ठरले’ अशी हळहळ सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

या अपघातात आई-मुलींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी उशिरा संध्याकाळी या दोघींची एकत्र अंत्ययात्रा काढण्यात आली. परिसरातील नागरिकांनी अश्रू ढाळत मायलेकींना शेवटचा निरोप दिला. सुनीता वाघमारे या उड्डाणपुलाखाली भाजीपाला विकून संसाराचा गाडा चालवत होत्या. त्यांच्या मागे पती आणि मुलगा आहे.

तर शीतलच्या पश्चात पती शोकाकुल अवस्थेत आहेत.अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक अशोक शेलार (वय ३४, रा. विंचूर दळवी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिक पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

शुबमन नाही हा खेळाडू होणार वनडे टीमचा कॅप्टन

नाला ओलांडताना मुख्याध्यापकच गेले वाहून; दुसऱ्या दिवशी थेट मृतदेहच..

लाडकी बहीण योजनेत आता थेट कारवाई, या लोकांना बसणार मोठा दणका…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *