भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचे संकेत जोरात दिसत आहेत. बीसीसीआयने आगामी काळासाठी नवीन रणनिती आखली असून, त्यानुसार एकाच खेळाडूवर तिन्ही फॉर्मेटचं नेतृत्व टाकण्याऐवजी वेगवेगळ्या कर्णधारांचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.सध्या शुबमन गिल टेस्ट टीमचा कॅप्टन (captain)असून T20 मध्ये उपकर्णधार आहे. रिपोर्टनुसार, गिलला T20 टीमचं नेतृत्व देण्यात येऊ शकतं. सूर्यकुमार यादव सध्या T20 टीमचं नेतृत्व करत आहे, पण वयाच्या 34 व्या वर्षी त्याच्या जागी बीसीसीआय युवा चेहऱ्याचा विचार करत आहे. गिल हा त्यासाठीचा पहिला पर्याय मानला जातो.

दरम्यान, आशिया कप टीममध्ये स्थान न मिळालेला श्रेयस अय्यर बीसीसीआयच्या दीर्घकालीन योजनांमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो. अय्यरला वनडे टीमचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “सरपंच साहेब” म्हणून ओळखला जाणारा श्रेयस अय्यर 2027 वनडे वर्ल्डकपपूर्वी वनडे टीमचा कॅप्टन म्हणून दिसू शकतो.

आशिया कपनंतर बीसीसीआयची मोठी बैठक होणार आहे. यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा होऊन त्यांच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल. जर त्यांनी टेस्ट आणि T20 मधून निवृत्ती स्वीकारली, तर गिल आणि अय्यर या दोघांनाही नवी जबाबदारी देण्यात येईल.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या क्रिकेटच्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही फॉर्मेटमध्ये एकाच कॅप्टनला (captain)सांभाळणं शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र कॅप्टनशिप हीच योग्य रणनिती असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या नव्या बदलांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला, महिलेसोबत केलं अश्लील कृत्य

“केंद्र सरकारकडून मंजुरी; तालुक्याचं नवं नाव ऐतिहासिक ठरणार”

वाढत्या वयाच्या व्याधींनी अमिताभ बच्चन त्रस्त…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *