रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्टीनुसार २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या आठवड्यात देशभरातील बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी बँकेशी(Bank) संबंधित महत्त्वाची कामे आधीच उरकून ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी लागू राहतील.

२५ ऑगस्ट (सोमवार):

गुवाहाटी येथे श्रीमंत शंकरदेव पुण्यतिथी निमित्त सुट्टी. इतर सर्व भागांत बँका सुरू राहतील.

२७ ऑगस्ट (बुधवार):

गणेश चतुर्थी निमित्त सुट्टी. या दिवशी मुंबई, बेलापूर, नागपूर, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, विजयवाडा आणि पणजी येथे बँका बंद राहतील.

२८ ऑगस्ट (गुरुवार):

गणेशोत्सवाचा दुसरा दिवस असल्याने भुवनेश्वर आणि पणजी येथे बँका बंद. इतरत्र बँका सुरू राहतील.

३१ ऑगस्ट (रविवार):

नेहमीप्रमाणे रविवारी देशभरात सर्व बँका बंद राहतील.

या आठवड्यात एकूण ४ दिवस बँका (Bank)बंद असल्या तरी एटीएम, नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. मात्र रोख रक्कम काढणे, ठेवणे किंवा महत्त्वाची कागदपत्रे जमा करणे यांसाठी बँकेत प्रत्यक्ष जाण्याची गरज असणाऱ्या ग्राहकांनी वेळेत नियोजन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

‘छावा’चा डिलीटेड सीन व्हायरल; औरंगजेब-शंभूराजांचा संवाद ऐकून अंगावर काटा

‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात CM फडणवीसांची मोठी घोषणा

मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; महिलांचा जोरदार राडा, Video viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *