राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (‘Ladki Bahini’)योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन महत्त्वाच्या मंत्र्यासोबतच काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्हयात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व पात्र ‘लाडक्या बहिणीं’ची पुन्हा ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण(‘Ladki Bahini’) योजनेअंतर्गत बोगस लाभार्थी असल्याचं समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवलीये.लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभघेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रविवारी नागपूरमधील सातनवरी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुमारे 26 लाख महिलांनी या योजनेचा गैरवापर केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता फडणवीस म्हणाले की, “या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरू आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभघेत आहेत, त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.”

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. विधानसभा निवडणुकीनंतर उर्वरित 11 लाख अर्जांची पात्रता तपासण्यात आल्यानंतर त्यात 7 लाख 76 हजार अर्ज छाणनीमध्ये बाद ठरले. जून महिन्यात सरकारने या योजनेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाने या योजनेतील सर्व पात्र लाभार्थींची ओळख पटविण्यासाठी सरकारच्या सर्व विभागाकडून माहिती मागविली होती.


या योजनेत 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थ्यांनी दरमहा 1,500 रुपयांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात 2 लाख 4 हजार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 300 बोगस लाभार्थी आढळले. तसेच, इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येही मोठ्या संख्येने बोगस लाभार्थी नोंदवले गेले.

फडणवीस यांनी सांगितले की, योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरू आहे आणि चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ बंद केला जाईल.योजनेसाठी 2 कोटी 63 लाख महिलांनी नोंदणी केली, त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या.
विधानसभा निवडणुकीनंतर 11 लाख अर्जांची पडताळणी केली गेली, त्यापैकी 7 लाख 76 हजार अर्ज छाननीत बाद ठरले.

हेही वाचा :

मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा; महिलांचा जोरदार राडा, Video viral

सलमान खानच्या घरात पहिली वादाची ठिणगी पेटली! कोणता सदस्य घराबाहेर…

ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदी झाले स्वस्त

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *