दादर : शिवाजी पार्कवरील स्वर्गीय मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. र्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (political news)यांच्या मातोश्री आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या काकी आहेत. ही घटना झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून आता मनसे नेते राज ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर हा प्रकार झाल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याचबरोबर मनसैनिक देखील आक्रमक झाले आहेत. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न झाल्यामुळे नेत्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे(political news) हे देखील शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा पुतळा असलेल्या परिसरात जी घटना घडली आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. या परिसरात नेमके काय काय घडले आणि आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे, याची संपूर्ण माहिती राज ठाकरेंनी घेतली.

दादर येथील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यांच्या या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काल (दि.16) रात्री हा प्रयत्न करण्यात आला असून यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या संतप्तजनक प्रकारानंतर ठाकरे गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मात्र घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील राजकीय(political news) वातावरण तापण्याची शक्यता आहे. पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. सीसीटीव्हीवरुन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठी भाषेच्या अस्मितेसाठी दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित आले. यानंतर अनेकदा दोन्ही बंधू हे एकमेकांच्या घरी आलेले दिसून आले. लवकरच दोन्ही ठाकरे बंधूंचा दसरा मेळावा देखील एकत्र होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यामुळे राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्रा दिसून आला आहे.राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचिन मोर यांनी घटनास्थळी येऊन आढावा घेतला. त्यानंतर सर्व घटनाक्रम राज ठाकरे यांना सांगण्यात आला. यानंतर राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे. घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईतील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई

आगामी निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का? शरद पवारांचं मोठं विधान

6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *