जळगावात एका पोलीस(police) कर्मचाऱ्याने पश्चिम बंगालमधील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. नितीन सपकाळे असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो जळगाव जिल्हा पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन सपकाळे याचे याआधीच लग्न झालेले असताना त्याने आपले वैवाहिक जीवन लपवून त्या महिलेला फसवले आणि लग्नाचे आश्वासन देत शहरातील विविध हॉटेल्समध्ये तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नव्हे तर आरोपीच्या आई व पत्नीच्या मदतीने त्या महिलेसोबत जबरदस्तीने मंदिरात लग्न लावून दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस(police) कर्मचारी, त्याची आई आणि पत्नी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी पुढील चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे जळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर
नवरा झोपल्यावर रात्रीचा व्हिडिओ कॉल करायचा