रोहित शर्माने नुकताच कसोटी किक्रेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. (Discussion)त्यानंतर त्याने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे रोहित शर्मा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार का? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या भेटीसंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ”रोहित शर्मा यांची आज वर्षा निवास्थानी भेट झाली. यावेळी त्यांचं स्वागत केलं. या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच रोहित यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.”

दरम्यान, या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडेवर रोहित शर्माच्या नावाचं स्डॅड उभारण्यात आलं आहे. या स्टँडचं उद्या उद्घाटन आहे. (Discussion)यासंदर्भात रोहितने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी, अशी चर्चा आहे.याशिवाय मुंबई ट्वेंटी-२० लीग २६ पासून सुरू होणार होती. मात्र आयपीएलच्या तारखा पुढे गेल्यामुळे या मुंबई लीगचे नियोजन कसे करायचे, हाही प्रश्न आहे. या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असंही बोललं जातं आहे. रोहित हा मुंबई ट्वेंटी-२० लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे
रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2013 मध्ये कसोटीत पदार्पण केलं. त्याने 67 कसोटी सामने खेळले असून 40.57 च्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 18 अर्धशतके आहेत. 212 धावा ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे.रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.(Discussion) मात्र, तो एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. त्याने भारतासाठी 273 एकदिवसीय सामने खेळले असून 48.77 च्या सरासरीने 11 हजार 168 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके लगावण्याचा विक्रम आहे. याशिवाय 32 शतके आणि 58 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.रोहित सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असून तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे. यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले असून 300 धावा केल्या आहेत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा १७ मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. यावेळी रोहित शर्माच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा :
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती
एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असणारांसाठी मोठी आनंदाची बातमी!
पक्ष तोडण्याची लायकी पाकिस्तान तोडण्याची नाही संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र