रात्री गाढ झोपेत असताना अनेकदा आपल्याला जाग येते. (sleep)याचं कारण असतो एक डास. रात्री झोपेत जेव्हा आपल्याला डास चावतात तेव्हा आपली झोपमोड होते. दररोजच्या या डासांमुळे होणार्या झोपेमोडीने तुम्ही पुरते वैतागत असाल. मात्र तुम्ही कधी नीट नोटीस केलंय का काही लोकांना डास अजिबात चावत नाही. मुळात त्यांच्याकडे डास अजिबात फिरकतंही नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत.माहितीनुसार, डासांकडे एक अद्भुत सेन्सर सिस्टम आहे. या सिस्टीमच्या मदतीने ते रक्त शोषण्यासाठी कोणती व्यक्ती योग्य हे ठरवतात.

खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून एका वेगवेगळ्या प्रकारचा वास येत असतो. जो त्यांच्या त्वचेतील घाण किंवा अस्वच्छपणामुळे येतो. काही लोकांचं शरीर डासांना आकर्षित करत नाही. त्याचप्रमाणे ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. ‘अ’ गटातील लोकांकडे मात्र डास अधिक प्रमाणात फिरकत नाहीत.(sleep)डास हे शरीराचं तापमान आणि घाम यांच्यामध्ये असलेल्या लॅक्टिक एसिडकडे अधिक आकर्षित होतात. ज्या व्यक्तींना जास्त घाम येत नाही किंवा ज्यांच्या शरीराचं तापमान सामान्य असतं तेव्हा त्या व्यक्तींकडे डास अधिक फिरत नाही.तुम्हाला हे वाचून खरं वाटणार नाही मात्र पण डास गडद रंगांकडे काळा, गडद निळा, लाल यांच्याकडे आकर्षित होतात. हलक्या रंगाचे कपडे घालणाऱ्या लोकांभोवती डास कमी प्रमाणात फिरतात.
डास चावू नये म्हणून काय करावं?
हलक्या रंगाचे(sleep) कपडे घाला
जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या
शक्य तितकं शरीर स्वच्छ आणि कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा
हेही वाचा :
कामाच्या वेळेत गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मृत्यू; न्यायालयाने दिला मोठा निर्णय
‘त्या’ प्रकरणात कुख्यात गुंड अरुण गवळी निर्दोष, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
रॉटविलर कुत्रा कोणाचाच नसतो, चार महिन्याच्या मुलीसोबत जे केलं, ते ऐकून थरकाप उडेल