राज्यात खळबळ उडवणाऱ्या अपघातप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (accident) अपघातामागे गुन्हेगारी कट असल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या प्राथमिक अहवालामुळे अनेक तर्कांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि वाहनाच्या तांत्रिक तपासणीनंतर सादर केलेल्या प्राथमिक निष्कर्षांमध्ये कोणताही ठोस गुन्हेगारी कट असल्याचे पुरावे अद्याप आढळले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अपघात हा यांत्रिक बिघाड, रस्त्याची परिस्थिती किंवा चालकाच्या (accident) नियंत्रणातील त्रुटीमुळे घडल्याची शक्यता तपासात समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.तपास यंत्रणांनी वाहनातील तांत्रिक बाबी, ब्रेक प्रणाली, तसेच अपघाताच्या वेळी वाहनाचा वेग यांची सखोल चौकशी केली. तसेच अपघाताच्या आधी आणि नंतरच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. काही संशयास्पद बाबींची चौकशी सुरू असली तरी सध्या तरी कटकारस्थानाचा ठोस पुरावा नसल्याचे सीआयडीने नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. (accident)विरोधकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती. सीआयडीचा अंतिम अहवाल येईपर्यंत सर्व बाजूंनी तपास सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या प्रकरणाचा सविस्तर अहवाल लवकरच जाहीर केला जाणार असून, त्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!