राज्यात मराठी भाषेला प्राधान्य देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (schools) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असून मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडत असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शाळांबाबत केवळ भावना व्यक्त करून उपयोग नसून ठोस कृतीची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सध्या ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून तब्बल ६९ टक्के विद्यार्थी मराठी शिक्षण घेत असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (schools) यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. विरोधकांनी मराठी शाळा बंद पडत असल्याचा आरोप केला.यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. राज्यात दोन हजार मराठी शाळा बंद पडल्याचा आरोप वारंवार केला जातो, मात्र असा आत्मविश्वास येतो कुठून? असा सवाल करत त्यांनी या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मराठी शाळा बंद करण्याबाबतची माहिती पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन शैक्षणिक धोरणाचाही उल्लेख केला.(schools) अभियांत्रिकीसह उच्च शिक्षण मातृभाषेत घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवताना विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञानही आत्मसात करणे आवश्यक असल्याचे नमूद करत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल शिक्षणात महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *