सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आज लक्षणीय चढ-उतार होत आहे.(Gold) जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर जाणून घ्या. गेल्या वर्षभरात सोन्याने जवळजवळ ८०% आणि चांदीने १८०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झालेत. परंतु गेल्या दोन ते तीन दिवसापासून चांदीच्या दरात घसरण झाल्याने गुंतवणुदारांमध्ये चिंता वाढलीय. घसरत्या दरामुळे सामान्य ग्राहकांना लाभ होताना दिसतोय.

गेल्या काही दिवसांपासून किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार होत आहेत.(Gold) लग्नाच्या हंगामामुळे दिल्ली आणि मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याची मागणी वाढलीय, परंतु किमतीतील तीव्र चढउतारांमुळे खरेदीदार गोंधळलेत. जागतिक तणाव आणि सुरक्षित आश्रयस्थान मालमत्तेची वाढती मागणीमुळे बाजारात अनिश्चितता निर्माण होतेय.आज मल्टी-कमोडिटी एक्सचेंज वर चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दुपारपर्यंत मार्च चांदीचा भाव ₹११,२६१.०० ४.२०%ने घसरून ₹२,५७,०५५.०० वर आलाय. हा दर ₹१,८७१ १.१६ ने घसरून ₹१५९,२७४ च्या पातळीवर पोहोचला आहे.
ग्राहक संशोधन फर्म स्मिटेन पल्सएआयने केलेल्या (Gold) देशव्यापी सर्वेक्षणात, ६२ टक्के तरुणांनी सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणत आहेत. तर म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि क्रिप्टोकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.या सर्वेक्षणात १८ ते ३९ वयोगटातील ५,००० लोकांची मुलाखत घेण्यात आली. यात सोन्यावरील विश्वास कायम असला तरी, खरेदी प्रक्रिया बदलतेय. पारंपारिक कुटुंबाच्या निर्णयांवर अवलंबून राहण्याऐवजी तरुण आता स्वतः कमी प्रमाणात सोने खरेदी करत आहेत.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!