अनेक सिनेमात दमदार भूमिका बजावल्यानंतर अभिनेत्रीने राजकारणात देखील प्रवेश केला, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 7 महिन्यांची प्रेग्नेंट असताना अभिनेत्रीने विमान अपघातात शेवटचा श्वास घेतला.आजही चाहते अभिनेत्रीला विसरु शकलेले नाहीत.

झगमगत्या विश्वात अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्री आहेत, ज्यांचं निधन झालं आहे. पण आजही त्यांचे सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात.. एवढंच नाही तर, त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.(death) अशीच एक अभिनेत्री, जिचं विमान अपघातात निधन झालं. तेव्हा अभिनेत्री 7 महिन्यांची गरोदर होती आणि अपघाताच्या 10 दिवसांनंतर तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का तर बसलाच पण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला अपघातानंतर कुटुंबियांना अभिनेत्रीला पाहता देखील आलं नाही.. आज अभिनेत्रीच्या निधनाला आनेक वर्ष झाली आहेत. पण तिचं निधन आजही चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सौम्या सत्यनारायण आहे. तिला सौंदर्या म्हणून देखील ओळखलं जातं होतं सौंदर्या हिचं लहानपण कर्नाटकातील बेंगळुरू येथे एका कन्नड ब्राह्मण कुटुंबात गेलं. सौम्या हिने तेलुगु, कन्नड, तामिळ, हिंदी आणि मल्याळम सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फार कमी कालावधीत अभिनेत्रीने स्वतःची ओळख निर्माण केली.

सौम्या हिने अनेक एकापेक्षा एक सिनेमात काम केलं. पण हिंदी सूर्यवंशम सिनेमामुळे तिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आणि चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या अभिनयाचं कौतुक केलं. (death) या सिनेमानंतर देशभरात सौम्या हिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली सौम्या तिच्या करियरमध्ये फक्त एका हिंदी सिनेमात काम करु शकली आणि 2004 मध्ये अभिनेत्रीचं निधन झालं जेव्हा सौम्या हिचं निधन झालं तेव्हा ती फक्त 31 वर्षांची होती आणि 7 महिन्यांची प्रेग्नेंट देखील होती.. पण निधनानंतर अभिनेत्रीचा मतदेह देखील कुटुंबियांना मिळाला नाही.

सांगायचं झालं तर, निधनाच्या काही दिवसांपूर्वी, अभिनेत्रीने राजकीय पक्षात प्रवेश केलेला पक्षाचा प्रचार करण्यासाठी अभिनेत्री करिम नगर पोहोचली होती. अभिनेत्रीचा विमान सकाळी जवळपास 11 वाजता टेक ऑफ झाला आणि 100 फूट उंचीवर गेल्यानंतर अपघात झाला. या अपघातात अभिनेत्रीसोबतत 4 लोकांचं निधन झालं. (death) धक्कादायक गोष्ट म्हणजे, अभिनेत्रीचं लग्न होऊन एक वर्षही झालं नव्हतं तेव्हा तिचं निधन झालं. 2003 मध्ये तिने एस. रघूशी लग्न केलं. लग्नाच्या वाढदिवसाला 10 दिवस बाकी असताना अभिनेत्रीचं निधन झालं.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *