थंडीच्या दिवसात मायग्रेनचा त्रास अनेकदा वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात हा त्रास अधिक सतावू नये यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे. चला तर मग आजच्या लेखात आपण मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळावा यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घेऊयात.

हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा तीव्र डोकेदुखी सुरू होते आणि (the winter)जेव्हा ताण वाढतो तेव्हा झोपेची पद्धत बिघडते आणि वेदना आणि वाढू शकतात. थंड हवा, तापमानात अचानक बदल आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे डोकेदुखीचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. मायग्रेन ही एक तीक्ष्ण, धडधडणारी डोकेदुखी आहे जी सामान्यतः डोक्याच्या एका बाजूला होते आणि या त्रासामुळे मळमळ, उलट्या किंवा प्रकाश, मोठा आवाज सहन न होणे अशा समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात कमी दिवस, कमी शारीरिक हालचाल आणि झोपेच्या पद्धती यामुळे मायग्रेनचा धोका आणखी वाढतो.
याव्यतिरिक्त थंडीमुळे स्नायू कडक होणे आणि रक्ताभिसरणात बदल होणे यामुळे देखील मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. बरेच लोकं हिवाळ्यात पाणी कमी प्रमाणात पितात, ज्यामुळे डिहायड्रेशन होते आणि मायग्रेनचा झटका येऊ शकतो आणि या सर्वांचा परिणाम आपल्या रोजच्या दैनंदिन कामकाजावरही होऊ लागतो. (the winter)अशा वेळेस योग्य काळजी घेतल्यास आणि काही आवश्यक खबरदारी घेतल्यास मायग्रेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो. तर आजच्या लेखात आपण हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास अधिक वाढू नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी ते जाणून घेऊयात.
तज्ञांच्या म्हणण्यानुसार मायग्रेनचा त्रास वाढू नये यासाठी संतुलित दैनंदिन दिनचर्या राखा. दररोज वेळेवर झोपणे आणि उठणे महत्वाचे आहे. थंडी टाळण्यासाठी, थंड हवेचा परिणाम कमी करण्यासाठी तुमचे डोकं आणि कान झाकून ठेवा. भरपूर कोमट पाणी प्या आणि डिहायड्रेशन टाळा.हलका व्यायाम, योगा किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
कॅफिन आणि तळलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा. त्यातच अधिक ताणामुळे मायग्रेन त्रास होऊ शकतो, म्हणून ध्यान किंवा खोल श्वास घेण्याचे प्रकार अवलंबवा. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घ्या.हिवाळ्यात थेट अति थंडीत किंवा प्रखर सूर्यप्रकाश जाणे टाळा.जास्त वेळ मोबाईल फोन किंवा स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर आणि डोक्यावर दबाव येतो, (the winter) ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.उपाशी राहणे टाळा आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवा.तीव्र वास, धूर किंवा मोठा आवाजात जाणे टाळा. मद्यपान आणि धूम्रपानामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, म्हणून ते टाळणेच चांगले.जर मायग्रेनचा त्रास वारंवार होत असेल किंवा पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाला असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. यामुळे योग्य उपचार मिळण्यास मदत होईल. वेळेवर काळजी घेतल्यास आणि योग्य सवयींचा अवलंब केल्यास हिवाळ्यातही मायग्रेन नियंत्रणात ठेवता येते.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत