जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या (jewelry)विम्यात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडळाने विम्यामध्ये वाढ केली आहे. किती आहे यंदाच्या विम्याची किंमत जाणून घ्या.गणरायाच्या आगमानच्या तयारीला आता सुरुवात झाली. मुंबई आणि पुण्यातील मानाच्या गणपतींच्या स्वागतासाठी भाविक देखील उत्सुक झाले आहेत. अशातच आता जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतल्या मानातच्या गणपतींपैकी एक म्हणजे जीएसबी गणपती. या गणपतीच्या मंडळाने यंदा 474 कोटी रुपयांचा विमा उतरला आहे. दरवर्षी या मंडळाच्या वतीने विमा जाहीर केला जातो. यंदा हा विमा 474 कोटीं रुपयांचा उतरवण्यात आला असून याचा प्रिमियम अद्याप सांगण्यात आलेला नाही.

गणपतीच्या मुर्तीसह, गणपतीचे पारंपरिक दागिने(jewelry), मंडप, कार्यकर्ते आणि दर्शनासाठी येणाऱया भाविकांचा असा एकूण 474 कोटींचा विमा उतरवण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसबी मंडळाकडे 67 कोटींचे गणपतीचे दागिने आहेत. त्याचबरोबर 325 कीलो चांदीचे दागिने आहे. त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते, पुजारी, आचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा तब्बल ३७५ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.

याशिवाय मंडळाने सामाजिक भान जपत आग प्रतिबंधक व भूकंप सारख्या आपत्तीमध्ये हाेणारे नुकसान टाळण्यासाठी 2 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवासाठी बांधण्यात येणारे मंडप आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा 30 कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. याबाबतची माहिती जीएसबी सेवा मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी दिली आहे.

मागच्या वर्षी मंडळाने 400 कोटींच्या विमा उतरवला होता. सोने व चांदीच्या दरात वाढ झाल्याने यंदा दागिन्यांच्या विम्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच याआधी म्हणजेच 2023 मध्ये 360.40 कोटी इतका विमा मंडळाने जारी केला होता. जीएसबी गणपती मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंंडळ असून गणेशोत्सावानिमित्ताने दररोज किमान 20000 इतके भाविक रोज दर्शनासाठी येत असतात, अशी माहिती देखील मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा :

एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा सम्राट ठरला हा खेळाडू….

सौंदर्यस्पर्धेतील उपविजेतीचं दुर्दैवी निधन; लग्नानंतर थोड्याच काळात…

पुढील 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *