रशियन मॉडेल(model) आणि ‘मिस युनिव्हर्स 2017’ स्पर्धेतील उपविजेती केसेनिया अलेक्झांड्रोवा हिचं केवळ 30 व्या वर्षी निधन झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी रशियातील ट्वेर ओब्लास्ट भागात झालेल्या कार अपघातात तिला गंभीर दुखापत झाली होती. 12 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात केसेनिया आपल्या पतीसोबत गाडीत प्रवास करत असताना अचानक एका प्राण्याने रस्त्यावर उडी मारली. या अपघातात केसेनिया प्रवासी सीटवर बसलेली असताना डोक्याला जबर मार लागला. ती जागीच बेशुद्ध झाली होती. तातडीने तिला मॉस्कोतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने ती काही आठवडे कोमात राहिली आणि अखेर मृत्यूशी झुंज हरली.
केसेनियाचं लग्न फक्त चार महिन्यांपूर्वी 22 मार्च रोजी झालं होतं. तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 2017 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत तिने रशियाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्याच वर्षी ‘मिस रशिया’ स्पर्धेतही ती पहिली उपविजेती ठरली होती. सौंदर्यस्पर्धांबरोबरच ती एक प्रोफेशनल मानसशास्त्रज्ञ होती आणि मॉस्को पेडॅगॉजिकल स्टेट युनिव्हर्सिटीमधून तिने पदवी मिळवली होती.

मोडस विवेंडिस या मॉडेलिंग (model)एजन्सीने तिच्या निधनावर शोक व्यक्त करत लिहिलं – “केसेनिया अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि दयाळू होती. तिच्या उपस्थितीने प्रत्येकाला प्रेरणा आणि आधार मिळायचा. तिचा मृत्यू आमच्यासाठी मोठी हानी आहे. जगभरातील चाहत्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून या अचानक झालेल्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :
पुढील 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा गंभीर इशारा
प्रेम आंधळं खरंच! AIवर फिदा होऊन पतीने मागितला घटस्फोट
अतिवृष्टीने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांची तातडीच्या मदतीची मागणी