गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आता देखील अशी चोरी झाली आहे. जाणून तुम्हीही डोक्यावर हात द्या… ज्वेलरीचं दुकान लुटण्यासाठी चोरांनी अशी शक्कल लढवली ज्यामुळे मालकाला मोठा धक्का बसला

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील बोरीवली येथील परिसरात कोट्यवधी रुपयांच्या चोरीमुळे खळबळ माजली आहे. एका ज्वेलरी शॉपवर निशाणा साधत चोरट्यांनी तब्बल 5 किलो सोनं चोरी केलं आहे. चोरीची घटना घडल्यानंतर, पोलीस चौकशीत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. (thefts) कोणी जवळच्याच व्यक्तीने चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं आहे, तर पोलिस आता फरार आरोपीचा शोध घेत आहेत. आहे.
मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीतील “माय गोल्ड पॉइंट” नावाच्या दागिन्यांच्या दुकानात ही मोठी चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा परिसर मुंबईतील प्रमुख निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांपैकी एक मानला जातो. संबंधित घटना 13 आणि 14 जानेवारी 2026 दरम्यान रात्री घडली आहे. जेव्हा सकाळी दुकान चालू करण्यात आलं, तेव्हा शोकेस रिकामे दिसले आणि लाखो नाही तर, कोट्यवधी रुपयांचं सोनं गायब झालेलं होतं. चोरी केलेल्या दागिन्यांची किंमत बाजारात 7 कोटी 88 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलीस तपासात समोर आलं आहे की, अरोपींना दुकानाचा टाळा तोडला नाही तर, डुप्लीकेट चावीचा वापर करून चोरी केली आहे. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीने चोरी केल्याचा संशय वर्तवण्यात आलाचोरी इतकी सुनियोजित होते की,(thefts) आजूबाजूच्या कोणाला देखील लक्षात आलं नाही. यामुळे सुरुवातीला पोलिसांना शंका आली की हे प्रकरण जवळच्या लोकांशी जोडलेले असू शकते.
चोरीची घटना घडल्यानंतर दुकानातील दोन कर्मचारी अचानक गायब झाले. ज्यामुळे संशय अधिक पक्का झाला. पोलिसांना दुकानाच्या आजू-बाजूला असलेले सीसीटीव्ही देखील तपासले आहेत. अखरे तपासात कळलं की, दुकान बंद करण्याची आणि चावी सांभाळण्याची जबाबदारी त्या दोन कर्मचाऱ्यांवर होती याच विश्वासाचा फायदा उचलत दोघांनी डुप्लीकेट चावी बनवली त्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी गणपत चदाणा (26) आणि किशनलाल उर्फ भैरू बगलाल रेबारी (21) यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, दोघांनीही महत्त्वाचे खुलासे केले.(thefts) त्यांच्या माहितीच्या आधारे, आतापर्यंत 3 किलो 100 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे तपासात एका अल्पवयीन मुलाची भूमिका देखील उघड झाली आहे, ज्याला ताब्यात घेऊन निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!
बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!
दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण