घरातील गॅस सिलेंडर कधी संपेल याचा नेमका अंदाज न आल्यामुळे अनेकदा गैरसोय होते. ऐनवेळी स्वयंपाक करताना किंवा पाहुणे आले असताना गॅस संपल्याचे लक्षात येते आणि मग धावपळ सुरू होते.(gas cylinder) मात्र आता सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेण्यासाठी कोणत्याही विशेष मशीनची गरज नाही. काही सोप्या आणि घरच्या घरी करता येणाऱ्या पद्धतींच्या मदतीने तुम्ही सहज अंदाज घेऊ शकता.

सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे ओल्या कापडाची ट्रिक. एक स्वच्छ कापड पाण्यात चांगले भिजवून ते सिलेंडरभोवती वरपासून खालपर्यंत गुंडाळावे. एक ते दोन मिनिटांनंतर कापड काढून सिलेंडरकडे लक्ष द्यावे. ज्या भागात गॅस नसतो तो भाग लवकर सुकतो, तर ज्या भागात द्रवरूप गॅस असतो तो भाग थंड राहिल्यामुळे ओलावा जास्त वेळ टिकतो.(gas cylinder) त्यामुळे ओलसर राहिलेला भाग म्हणजे सिलेंडरमध्ये उरलेला गॅस, असा साधा अंदाज घेता येतो.

दुसरी पद्धत म्हणजे वजन तपासणे. प्रत्येक सिलेंडरवर त्याचे रिकामे वजन म्हणजे टेअर वेट लिहिलेले असते. घरातील काट्यावर किंवा वजनकाट्यावर सिलेंडरचे सध्याचे वजन करून त्यातून टेअर वेट वजा केले की उरलेली संख्या म्हणजे सिलेंडरमधील गॅसचे वजन. सामान्य घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये साधारण १४.२ किलो गॅस भरलेला असतो. त्यामुळे किती गॅस वापरला गेला आणि किती शिल्लक आहे याचा साधारण अंदाज येऊ शकतो.

गॅस संपत आल्याची काही नैसर्गिक चिन्हेदेखील असतात. गॅसची ज्योत नेहमीसारखी निळी आणि स्थिर दिसत नसेल, ती पिवळसर होत असेल किंवा स्वयंपाकाला जास्त वेळ लागत असेल, तर गॅस कमी होत असल्याची शक्यता असते.(gas cylinder) अशा वेळी उशीर न करता नवीन सिलेंडर बुक करणे योग्य ठरते.याशिवाय सिलेंडर हलवूनही अंदाज घेता येतो. पूर्ण भरलेला सिलेंडर हलवला तर आतून फारसा आवाज येत नाही. मात्र गॅस कमी झाल्यावर सिलेंडर हलवल्यास आत द्रव हालचाल करत असल्याचा आवाज जाणवतो. हा आवाज गॅस कमी झाल्याचा संकेत असू शकतो.

या साध्या उपायांचा वापर करून तुम्ही गॅसची पातळी वेळेवर ओळखू शकता आणि ऐनवेळी होणारी अडचण टाळू शकता. थोडीशी जागरूकता आणि योग्य वेळी तपासणी केल्यास घरातील स्वयंपाक सुरळीत सुरू राहील.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!

बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!

दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *